अहिल्यानगर: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. सत्तार यांच्या मुलाने विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे. सत्तार यांनी भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची टीका केली होती. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. राऊत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याच्या सत्तारांच्या आरोपांनंतर महायुतीत तीव्र पडसाद उमटत असून, त्यांना तातडीने प्रमुख नेत्यांनी बैठकीसाठी पाचारण केले आहे. एकीकडे सत्तारांची मनधरणी आणि चौकशीचे नाट्य सुरू असतानाच, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेत शिंदे गटातील नेत्यांना मोठी ऑफर दिली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “अब्दुल सत्तारांचे हे वैयक्तिक मत असू शकते. कदाचित त्यांना आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटासोबत गेल्याचा पश्चाताप झाला असावा. शिंदे गटातील काही नेते तर भाजपला ‘स्लो पॉयझन’ देखील म्हणत असल्याची माहिती मला कोणाकडून तरी मिळाली आहे. जर कोणाला महायुतीत गुदमरल्यासारखे वाटत असेल आणि भाजप हे स्लो पॉयझन आहे अशी खात्री पटली असेल, तर त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या छत्रछायेखाली यावे. काही विशिष्ट नेत्यांना आमच्या पक्षात पुन्हा येण्यास कायमचा मज्जाव असेल हे मात्र नक्की.’
दरम्यान, मातोश्रीच्या मनात नेमकं काय आहे, याचे संकेत दिले. सत्तारांच्या विधानामुळे महायुतीत आधीच तणाव असताना, राऊत यांच्या या ‘स्लो पॉयझन’ आणि ऑफरच्या विधानाने राजकीय वातावरण आणखीच तापले आहे.