कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण…

Cockroach-Janta-Party
Share

जयपूर (राजस्थान): कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) शाळा भेटींविरोधात जयपूरमध्ये कडाडून विरोध सुरु असून आज (शुक्रवार) बागरू येथील रामपुरा कंवरपुरा येथील शासकीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी आलेले सीजेपीचे सह-संयोजक आणि प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली.

महिलांनी रांका यांच्या महिला समर्थकांवर चिखलफेक केली. दुसरीकडे, सीजेपीच्या काही कार्यकर्त्यांची गावकऱ्यांशी झटापट झाली होती. गावकऱ्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना गावातून हाकलून दिले. सीजेपीविरोधात घोषणाबाजी करत गावकऱ्यांनी शासकीय शाळेबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली लावून मुख्य रस्ता अडवला. लोकांनी मुख्य रस्ता बंद केला होता आणि वाहनांची तपासणी केली जात होती.

शाळेची दुरुस्ती आम्ही स्वतःच्या खर्चाने करू, असे गावकऱ्यांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. सरकारने 12.50 लाख रुपयांनाही मंजुरी दिली होती. आम्ही कोणत्याही बाहेरील व्यक्तीला येथे येऊ देणार नाही. कॉकरोचना येथे येऊन घाण करायची असते, जे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. रामपुरा येथील शाळा जीर्ण इमारतीमुळे बंद करण्यात आली आहे. मुलांना जवळच्याच एका आवारात शिकवले जात आहे. सीजेपी टीम जयपूरमधील दोन सरकारी शाळांना भेट देणार होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *