अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…

ajit-pawar
Share

बारामती : दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अपघात की घातपात? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून राज्य सरकारने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावे या मागणीसाठी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गाव आज (सोमवार) बंद ठेवण्यात आले आहे.

अजित पवार यांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी रविवारी (ता. २२) बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव बंद ठेवण्यात आले होते. यावेळी लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहत सखोल चौकशीची मागणी केली होती. यानंतर बारामतीमधील आणखी एका गावामध्ये बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच वेगळाच पॅटर्न बघायला मिळत आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या बातम्या पाहता आम्हाला अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवेदन देणार आहोत. अजित पवार यांचा विमाना अपघातात मृत्यू झाला त्या घटनेची सखोल चौकशी व्हावी, यासाठी बारामतीतील प्रशासकीय भावना बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले आहेत. प्रांत अधिकारी यांना दिवेदन देऊन सरकारने याची सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करणार आहेत. कार्यकर्त्यांना अजित पवार यांचा झालेला विमान अपघात हा घातपात वाटतो आहे. अशी शंका या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत स्व. अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकप्रस्ताव मांडला जाणार आहे. पारंपरिक पद्धतीनुसार हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला जाईल आणि त्यांच्याच हस्ते वाचून दाखवला जाईल. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबाबत सभागृहात मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे गटनेते तसेच प्रत्येक पक्षातील किमान तीन सदस्य हे सभागृहात आपली भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…

काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…

अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…

रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…

अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…

अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *