राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृणपणे हत्या…

mangesh-kalokhe-khopoli
Share

रायगड: खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांच्या पतीची आज (शुक्रवार) सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे, याबाबतीत पोलिस अधिक माहिती घेत आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार, मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना काळोखे यांच्यावर हल्ला झाला. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिवसाढवळ्या हत्येच्या घटनेनं खोपोली शहर हादरले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेले होते. मात्र परतताना त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला चढवत निर्घृणपणे संपवले. हल्लेखोर हे एका काळ्या रंगाच्या गाडीतून आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटू शकली नसल्याचे उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. ही हत्या जुन्या राजकीय वादातून झाली आहे की यामागे अन्य काही वैयक्तिक कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. सध्या आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *