मुंबईः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतल्यापासून राज्यभर भेसळखोरांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, मसाले आणि खाद्यतेलाची मागणी वाढते. त्यामुळे एफडीए कडून विशेष तपासणी मोहिम राबवली जात आहे. अशातच आता एफडीएच्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.
View this post on Instagram
तुकाराम मुंढे यांच्यासह नाशिक विभागाने धडक कारवाई सुरू केली असून चार जिल्ह्यांत मागील 10 दिवसांत केलेल्या 36 कारवायांमध्ये 5 कोटी 40 लाख 16 हजार 621 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर एफडीएचं कौतुक करण्यात आलं होते. अशातच सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी येथे उघडकीस आलेल्या 17 लाख रुपयांच्या संशयास्पद दूध पावडर साठा प्रकरणात अन्न व औषध प्रशासनातील दोन जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.
एफडीएचे सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्नसुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांच्यावर चौकशी बसवण्यात आली होती. दोघांन विहित कायदेशीर कर्तव्य बजावण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचं चौकशीमध्ये समोर आले आहे. जुलै महिन्यात पुतळेवाडी इथं टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात दूध पावडर जप्त झाली होती. यात मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून आली होती.
तुकाराम मुंढे यांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड; ११ रुपयांचे सलाईन कितीला पाहा…
तुकाराम मुंढे यांनी राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेजवर दिलं उत्तर…
तुकाराम मुंढे यांनी मोर्चा वळवला खाद्य तेलाकडे; भेसळ केल्यास 10 लाखापर्यत दंड…