मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामधील लाच प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशचा व्हिडीओ समोर आला आहे. एसीबीने झिरवाळ यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. या कारवाईत एसीबीने क्लर्कला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. मंत्रालयातील लाच प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर १२ फेब्रुवारीला एसीबीने छापा टाकला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणारा क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ढेरंगे सध्या एसीबीच्या कोठडीत आहे. राजेंद्र ढेरंगे याने मेडीकलचा परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. यामधील ३५ हजार रुपये घेत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील जो लाच मागतानाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यानचा आहे. यात राजेंद्र ढेरंगे याने व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीकडे ५० हजारांची लाच मागितली होती. लाच म्हणून त्या व्यक्तीकडून ५० हजार रुपये दिल्याचेही कळते. तर दुसरी एका प्रकरणात अशीच लाच दुसऱ्या एका तक्रारदाराकडे राजेंद्र ढेरंगे यानी मागितली. पैसे द्यायची त्यांची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीला याबाबत माहिती दिली. एसीबीने मग सापळा रचून पैसे घेताना राजेंद्र ढेरंगे याच्यावर कारवाई केली. अशाच प्रकारे राजेंद्र ढेरंगे यांने अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय एसीबीला आहे. एसीबीच्या कारवाईनंतर हे स्टिंग ऑपरेशन आता बाहेर आले आहे. एसीबीने नरहरी झिरवळ यांच्या विभागात केलेल्या कारवाईचा व्हिडिओ समोर आला आहे. राजेंद्र ढेरंगे याचा लाच मागतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये ढेरंगे पैशाबद्दल बोलताना कैद झाला आहे “50 घेऊन ये आणि तुझं काम करून घेऊन जा, कधी येणार सांग मला तसं तयारीत राहावं लागेल. साहेब येतील, पुढच्या हफ्त्यात यावं लागेल” असे ठेरंगे हा या व्हिडीओमध्ये बोलत आहे.
’50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा’, मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन #bribecase #narharizirwal pic.twitter.com/T3fQzPld7v
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) February 19, 2026