न्यूयॉर्क: व्हाईट हाऊस पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने हादरलं आहे. डिनरसाठी गेलेल्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना लक्ष्य करण्यासाठी एक माथेफिरू अनेक शस्त्रास्त्रांसह हॉटेलमध्ये घुसला. सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हा मोठा कट उधळून लावला आहे.
व्हाईट हाऊस वार्ताहरांच्या वार्षिक स्नेहभोजन सोहळ्याबाहेर शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असून अमेरिकेच्या इतर वरिष्ठ नेत्यांना बॉलरूममधून बाहेर काढण्यात आले. सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. गोळीबारानंतर सीक्रेट सर्व्हिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी वॉशिंग्टन हिल्टन येथील सभागृहात धाव घेतली. शेकडो उपस्थितांनी टेबलाखाली आसरा घेतला होता. एका सुरक्षा अधिकाऱ्याला गोळी लागली, मात्र बुलेटप्रूफ जाकीट परिधान केलेले असल्याने ते सुखरुप आहेत. एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया ट्रम्प आणि इतर वरिष्ठ नेत्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या काही व्हिडिओंमध्ये मोठे आवाज ऐकू आल्याचा दावा करण्यात आला होता, किंबहुना या व्हिडिओंची सत्यता अद्याप पडताळली गेलेली नाही. गोळीबारानंतर परिसर सील करण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेले हल्ले पाहा…
२६ जुलै 2016
ओहिओ
डिमेसिमा नावाचा माथेफिरू सभेत ट्रम्पवर चाल करुन गेला
१८ जून 2016
लास वेगास
हत्येचा प्रयत्न फसला,पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा होता इरादा
५ नोव्हेंबर 2016
रेनो,नेवादा
मध्ये ट्रम्प भाषण देताना एक जण बंदूक नावाने ओरडला, ट्रम्प स्टेज सोडून गेले
६ सप्टेंबर २०१७
मंडान, उत्तर डकोटा
फोर्कलिफ्ट ट्रक ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न
१ ऑक्टोबर २०१८
काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटे पाठवली
१० ऑगस्ट २०२०
ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊसबाहेरच ठार केले
१३ जुलै २०२४
बटलर, पेनसिल्वानिया
जाहीर सभेतील भाषणावेळी थॉमस क्रूक्सनं झाडल्या ट्रम्पवर आठ गोळ्या,एक कानाला चाटून गेली, ट्रम्प जखमी
१५ सप्टेंबर २०२४
पाम बिच, फ्लोरिडा
ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानात तरुण बंदुकीसह झुडपात दडला, जवानाने गोळीबार करताच पळाला
२५ एप्रिल २०२६
हॉटेल हिल्टनमध्ये डिनरसाठी गेले असता बॉलरुममध्ये गोळीबार, प्रत्युत्तरात हल्लेखोर ठार
भारतीय वंशाच्या मुस्लीम युवकानं अमेरिकेत घडवला इतिहास; ट्रम्प यांना मोठा धक्का…