अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर; तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर…

dhananjay-munde
Share

मुंबईः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज (शनिवार) एक महिना पूर्ण झाला आहे. अजित पवार यांचा अपघात की घातपात याची उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहणार असल्याचा निर्धार आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेवरून घरचा आहेर दिला आहे. रोहित पवार जर चमकोगिरी करत असतील तर मग मी पण हे प्रश्न विचारून चमकोगिरी करतो आहे का? प्रश्न विचारणे आणि या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर हे बोलणं योग्य नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी धनंजय मुंडे यांना घरचा आहेर दिला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

राजकीय दृष्टिकोनातून जर रोहित पवार आमच्या पक्षाबद्दल बोलत असेल तर मी त्याला उत्तर देणार नाही. मी फक्त अजित पवारांच्या अपघाताबद्दल जर ते प्रश्न विचारत असतील तर त्यांच्यासोबत मी असेन, असे मिटकरी यांनी नमूद केले. अधिवेशन सुरू असताना आणि मागच्या महिन्याभरात एक दिवस असा गेला नाही अजित पवार यांची आठवण आली नाही. अजूनही वाटतं सभागृहात अजित पवार येतील आमच्याशी चर्चा करतील, देवगिरीला बैठकीला आमच्या सगळ्या आमदारांना बोलवतील पण आता अजित पवार आमच्यात नाहीत, अशी खंत मिटकरी यांनी बोलून दाखवली.

मिटकरी म्हणाले की, रोहित पवारांच्या सोबत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या सोबत मी आहे, रोहित पवारांचा जसा काका केला तसा सुद्धा माझा जवळचा माणूस गेला आहे. त्यामुळे मी प्रश्न विचारणार आणि कुठल्याही पक्षाचा आमदार आमच्या सोबत असला तरी त्याला सोबत घेणार, असा निर्धार व्यक्त केला. मला आमच्याच पक्षातील नेते बोलत आहेत, तुम्ही का प्रश्न विचारताय? तुम्ही अजित पवारांच्या अपघातावर का जास्त बोलताय? मला माहित नाही ते असं का बोलतात पण मला जे योग्य वाटतं ते मी करत असल्याचे मिटकरी म्हणाले. माझ्या पक्षातील काहीजण माझ्यासोबत प्रश्न उपस्थित करतात आता बाकीचे का प्रश्न उपस्थित करत नाहीत हे मी सांगू शकत नाही.

रोहित पवार यांच्यावर टीका; माझी वाचा गेली असती तर बरं झालं असतं : धनंजय मुंडे

अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र! दादा आय लव्ह यु. ‘खूप मिस करतोय दादा’…

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, तोपर्यंत शर्टचं बटण…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…

काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…

अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…

रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…

अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…

अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *