कर्तव्य फाउंडेशनतर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न…

kartawya-foundation
Share

पुणे : मातृभाषेचा अभिमान आणि थोर कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्तव्य फाउंडेशनतर्फे २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचे खास आकर्षण म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून सिद्धार्थ ग्रंथालयास बाळासाहेबांच्या जीवनप्रवासावर आधारित पुस्तके भेट देण्यात आली.

सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘सत्कारमूर्ती’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यामध्ये:
संदीप कद्रे (सहसंपादक, पोलिसकाका न्यूज)
मुकीम तांबोळी (प्रसिद्ध व्यंगचित्रकार)
प्राचार्य मनीष खंडागळे
दिलीप निगडे (ग्रंथपाल)
डॉ. शंकर मुगावे (समाजसेवा अधीक्षक)
शाम साहनी (पॉवरलिफ्टर)
डॉ. सुधाकर शेट्टी (बालरोग तज्ञ) आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

कार्यक्रमाला शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संजय मोरे, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बापूसाहेब गानला, भीमराव पाटोळे, प्रा. विलास आढाव, अशोक मेहेंदळे, मोहन दुधाणे, राज राणे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन विकास भांबुरे (अध्यक्ष, कर्तव्य फाउंडेशन), अशोक देशमुख आणि दिलीप भिकुले यांनी केले होते. “मराठी भाषेचे संवर्धन आणि समाजसेवकांचा सन्मान हीच खरी कुसुमाग्रजांना श्रद्धांजली आहे,” अशी भावना यावेळी आयोजक विकास भांबुरे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *