लुधियाना (पंजाब): लुधियानाच्या महापौर इंदरजीत कौर यांचे पती रवी आनंद लकी यांनी अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप महिला प्राध्यापिकेने केला आहे. यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
महिला प्राध्यापकाने सांगितले की, महापौरांचे पती संदेशांमध्ये ‘हॉट’ म्हणत फिगरचे फोटो मागत आहे. मनालीला लाँग ड्राईव्हवर घेऊन जाण्याचा प्रस्ताव देत आणि तिच्या खासगी पार्टबद्दल अभद्र टिप्पणी केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर महापौर पती रवि आनंद लकी सहानुभूतीच्या नावाखाली चॅटिंग करू लागले. जेव्हा मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिचा छळ केला. मुख्यमंत्री भगवंत मान, पंजाबचे ‘आप’ प्रभारी मनीष सिसोदिया आणि महिला आयोगाकडेही तक्रारी दाखल केल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.’

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
महापौरांचे पतीने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, महापौर इंदरजीत कौर यांनी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करावी, जिथे तपास केला जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान, महिला प्राध्यापिकेसोबतच्या अश्लील चॅटनंतर, लुधियानाच्या महापौरांच्या पतीचे एक कॉल रेकॉर्डिंग समोर आले आहे. यामध्ये, महापौर इंदरजीत कौर यांचे पती, रवी आनंद, जे ‘लकी’ नावानेही ओळखले जातात, तो वारंवार फोटो मागत आहे, पण त्या त्या मागणी नाकारतच राहिल्या. त्या बोलू लागल्या, पण फोटो मागण्यावर ठाम होता. सुमारे 2.25 मिनिटांच्या या कॉल रेकॉर्डिंगमध्ये, रवी आनंदने नऊ वेळा फोटो मागितला. मुख्याध्यापिकेने तो देणार नाही असे सांगितले. सार्वजनिक केलेल्या सर्व चॅट्समध्ये, रवी आनंदने वारंवार फिगरचा फोटो मागितला आहे.
महिला प्राध्यापिकेचे म्हणणे आहे की, रवी आनंद लकी खूप धूर्त आहे. रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून तो सामान्य फोन करत नसे. तिने सांगितले की पुरावे गोळा करण्यासाठी, तिने अनेकवेळा सामान्य फोन करण्यास सांगितले, पण केला नाही. तो फक्त मेसेंजरद्वारेच फोन करत असे. तिने स्पष्ट केले की पुरावे गोळा करण्यासाठी तिने स्क्रीन रेकॉर्डिंगबद्दल माहिती मिळवली आणि मग हे रेकॉर्डिंग केले. जेव्हा तो तिला अधिकाधिक अश्लील संदेश पाठवू लागला, तेव्हा पुरावे गोळा करण्यासाठी सापळा रचल्याचे त्यांनी सांगितले. तो पाठवलेला प्रत्येक संदेश डिलीट करत असे, जेणेकरून कोणीही तो वाचू शकणार नाही. एके दिवशी, तिने स्क्रीन रेकॉर्डर चालू केला आणि त्याचे संदेश रेकॉर्ड केले.