मुंबईः जयंत पाटील हे आपल्या मुलाला घेऊन भोंदूबाबा अशोक खरात याच्या ईशान्येश्वर मंदिरता गेले होते. यासंदर्भात जयंत पाटील यांची चौकशी झाली पाहिजे. अशोक खरात हा एकदा सांगलीतील ईश्वरपूर येथेही गेला होता. त्यावेळी राजकीय करिअर चांगले करण्यासाठी अशोक खरात याने जयंत पाटील यांना रक्ताने आंघोळ घातली होती, असा सनसनाटी दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
सार्वजनिक कार्यक्रमातील फोटोला महत्त्व नाही. नेते मंडळी गेले तर काही नाही. मात्र, मठात जाणं, मंदिरात जाणं, पूजा पद्धतीचा अवलंब करणं हे घातक आहे. जयंत पाटील यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी. जयंत पाटील यांना माणसाच्या रक्ताने आंघोळ घालण्यात आली की नाही, हे समोर आले पाहिजे. खरात याने नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना ज्या रक्ताने आंघोळ घालण्यात आली ते रक्त कोणाचे होते, ह समोर आले पाहिजे. जयंत पाटील हे स्वत:ला पुरोगामी नेते म्हणवतात. दे देवधर्म मानत नाहीत. मग ते अशोक खरातकडे कशासाठी गेले होते, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.
महिला अत्याचारावर जयंत पाटील यांची काय भूमिका आहे? हे पण तपासायला पाहिजे. गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा यांचा गुरू आहे. खरात जयंत पाटील यांच्याकडे पूजा घालतो, हे सगळ्या ईश्वरपूरला माहिती आहे. जयंत पाटील यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. अशोक खरात याच्यासाठी 40 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन का दिली? यात जयंत पाटील यांचा मोठा सहभाग दिसतो, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
जयंत पाटलांवर अशोक खरातची कृपा असेल आणि त्यांनी त्याचं मुत्र प्राशन केलं असेल तर जयंत पाटलांना त्याची राजकीय ताकद मिळाली असेल असा टोला गोपीचंद पडळकरांनी लगावला. ते म्हणाले की, “जयंत पाटील आणि त्यांच्या पोराने अशोक खरातची पूजा केली असेल अशी चर्चा आहे. आता मी जयंत पाटलांच्या डोक्यावर कलश ठेवून पूजा केल्याचा व्हिडीओ कधी समोर येतोय याची वाट पाहतोय. अशोक खरात हा ईश्वरपूरमध्ये दोन दिवस होता अशी चर्चा आहे. पोलीस तपासात हे सगळं पुढे येईलच.”
एका बाजूला पुरोगामी असल्याचं हे म्हणतात, दुसऱ्या बाजूला अशी भोंदूगिरी करतात. कुणाच्या मतांसाठी तुम्ही ही भोंदूगिरी करताय असा सवाल पडळकरांनी विचारला. जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असताना त्या अशोक खरातला 40 किमी पाईपने पाणी देण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्रिपदाच्या आशेवर असलेले जयंत पाटील हे आता झेडपीवर आले आहेत, झेडपी सदस्यांना धरून बसले होते. पुढे ते ग्रामपंचायतीवर येतील, असा टोला पडळकरांनी लगावला आहे.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांचीही होणार चौकशी…
अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…
रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…
अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…