देवेंद्र फडणवीस यांची धक्कादायक माहिती! अशोक खरातने महिलांच्या योनीत बोट घातले, लघवी पाजली…

ashok-kharat-nashik
Share

मुंबई : अशोक खरात याने आपण दैवी अवतार असल्याचे सांगत महिलांचे शोषण केले, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केला, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून, अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

मुख्यमंत्र्यांनी दिलेले निवेदन पुढीलप्रमाणे, अशोक खरात प्रकरणात आरोपीने महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी मागितले होते. या प्रकरणात नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी नीरज जाधव याने एआय फोटो व्हायरल केला नंतर डिलीट केला. त्यामुळे संबंधित महिलेला नीरज जाधवच्या विरोधात पुरावा देता आला नाही. परंतु या प्रकरणातील पीडित महिलांना विश्वासात घेऊन, त्यांचे समुपदेशन करून, कोणतीही ओळख सार्वजनिक न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून तपास सुरू आहे.

नाशिकच्या सरकार वाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तक्रार केली. या महिलेला गुंगीचे औषध देऊन, तिच्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार करण्यात आला. अशोक खरात हा महिलांना संमोहित करायचा. विधीच्या नावाखाली त्यांच्या पोटावरून हात फिरवायचा, त्यांच्या योनीत बोट घालायचा. तीर्थाच्या नावाखाली त्यांना लघवी पाजायचा. तसेच आपण दैवी अवतार असल्याचं सांगत या प्ररकरणाची वाच्यता कुठे केल्यास दैवी कोप होईल अशी धमकी द्यायचा.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

या गुन्ह्याचा प्राथमिक तपास करत असताना 6 लाख रोकड, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले. डीव्हीआर, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे आणि फायर केलेले पाच काडतुसे मिळाली. त्यानुसार 17 मार्च रोजी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी काही पीडित महिलांची ओळख पटवण्यात आली, त्यांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यात तयार करण्यात आले. पिडीत महिलांचे फोटो, व्हिडीओ फेसबुक तसेच सोशल मीडियावरून डिलीट करण्याचे काम सुरू आहे.

अशोक खरातची 33 एकर जमीन, फार्म हाऊस, आणि इतर ठिकाणी जमिनी, फ्लॅट, पनवेल येथील 40 गुंठे जमीन, मुलीच्या नावावर असलेला पुण्यातील फ्लॅट, सिन्नर येथे मंगल कार्यालय जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंत 40 कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे. तसेच अशोक खरातच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली मालमत्ता या संदर्भात चौकशी सुरु आहे.

आरोपीच्या शिवनिका संस्थानची चौकशी करण्यायत येत आहे. या प्रकरणातील पीडित आणि आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेले पुजारी आणि इतर लोकांचेही जबाब घेतले आहेत. चार पीडित महिलांचे जबाब घेऊन पाच गुन्हे दाखल केले आहेत.

अशोक खरातचा बड्या उद्योगपतीला फोन; ती महिला झाली प्रेग्नंट…

रूपाली चाकणकर यांच्या बोटाला दुखापत कशी झाली? सीसीटीव्हीमध्ये मिळेल पाहायला…

अशोक खरात स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर जोड्या जुळवायचा अन्…

अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…

नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…

गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…

नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…

रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…

अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…

धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…

खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…

रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *