मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशोक खरात प्रकरणावरून सत्ताधारी आणि राजकीय व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “ज्या महाराष्ट्राला संतांची आणि विचारांची थोर परंपरा आहे, तिथे खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो, हे पाहून महाराष्ट्राचे अध:पतन झाल्याची भीती वाटते,” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा दाखला दिला. “जिथे लोकमान्य टिळक ‘गीतारहस्य’ लिहितात आणि यशवंतराव चव्हाणांसारखे नेते तर्कतीर्थांशी संवाद साधतात, त्याच महाराष्ट्रातले आजचे नेते तर्काला तिलांजली देऊन कुठल्यातरी अजब ‘तीर्था’साठी खरातसारख्याच्या भजनी लागतात, हे भीषण आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेषतः 2013 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित करणाऱ्या आमदारांपैकीच काही जण या प्रकरणात अडकले असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून, हा मोठा विरोधाभास असल्याचे स्पष्ट केले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
“आमदारकी, खासदारकी आणि मंत्रीपदाच्या हव्यासापोटी नेते इतके अंध झाले आहेत की, चमत्काराची खात्री देणाऱ्या कोणाच्याही पायी ते लीन होतात.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हे प्रकरण आम्हीच उघडकीस आणले’ असे म्हटल्याचा संदर्भ देत राज यांनी सवाल केला की, “हे सर्व घडत असताना तुमच्याच घटक पक्षातील नावांभोवती संशयाची सुई असताना तुम्हाला सुगावा का लागला नाही?” हे प्रकरण केवळ कोणाच्या तरी राजकीय महत्त्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी वापरले जात असल्याची चर्चा कानावर येत असल्याचे सांगत, राज ठाकरेंनी इशारा दिला की, “जर समोरच्याने शरणागती पत्करली आणि हे प्रकरण बासनात गुंडाळले गेले, तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले म्हणून समजा.”
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…
मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…
धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…