विधानसभेत राडा! अशोक खरात याला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा; अन्यथा…

Capton-Nashik
Share

मुंबई: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी भोंदू अशोक खरात याला अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या विकृत कारनाम्यांचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. विरोधकांनी अशोक खरात प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले.

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

विधानसभेत बोलताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे? या भोंदू महाराजाचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यात अनेक राजकीय नेते, महसूल विभागाचे बडे अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती दिसत आहेत. या सर्वांचे सीडीआर तपासले पाहिजेत. हा बाबा ‘अशोक जल’ बनवायचा आणि त्यात ‘व्हायग्रा’ मिसळायचा, असा खळबळजनक दावाही वडेट्टीवारांनी केला. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली असून सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. “खरातला जे कोणी भेटले आहेत, त्या सर्वांची सरकारने HIV टेस्ट करावी, अन्यथा राज्यावर मोठे संकट येईल.’

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला. “अशोक खरातसोबत ज्या ज्या व्यक्तींचे फोटो समोर आले आहेत, त्या सर्वांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे, त्याच धर्तीवर इतर संशयितांचेही राजीनामे घेतले पाहिजेत,” अशी मागणी पटोले यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही सरकारवर कडाडून टीका केली.

अशोक खरातच्या संदर्भात जो विषय घडलेला आहे तो अतिशय गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. या प्रकरणी आजही महत्त्वाचा तपास होणार असल्याचे आपण सभागृहात मंगळवारी सविस्तर निवेदन करू, असे त्यांनी म्हटले. हा विषय गंभीर असून आपण कोणालाही क्लिन चीट देत नाही. मात्र, या प्रकरणात ज्याचा दुरान्वये संबंध असला तरी त्याच्यावर कारवाई होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांनी घेतली उडी…

नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…

गंभीर आरोप! रुपाली चाकणकर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार…

नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…

रुपाली चाकणकर यांनी व्हायरल फोटोंवर दिलं स्पष्टीकरण…

मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…

अशोक खरातचा आणखी एक भयंकर कांड, प्रसादात मिसळायचा घाणेरडा पदार्थ…

धक्कादायक कारण! रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला हाताची अनामिका का कापलेली…

खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…

रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…

मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…

रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…

मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *