नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात बदल होताना दिसत आहेत. भारतात मागील काही दिवसांच्या अंतरात चार वेळा इंधनाची दरवाढ करण्यात आली. या चार वेळेच्या दरवाढीत पेट्रोल-डिझेलच्या दरात ७ रुपयांची वाढ झाली. तर, इंधन दरवाढीने हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवरही आर्थिक भार वाढला होता. आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
इंधन दरांच्या बाबतीत केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल, डिझेल आणि विमानाचे इंधन म्हणजेच एटीएफच्या (ATF) निर्यातीवर (Export) लागणाऱ्या ड्युटीमध्ये (Tax) सरकारने मोठी कपात जाहीर केली आहे. शनिवारी, ३० मे रोजी सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, हा नवा बदल १ जूनपासून लागू होणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
सरकारने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, पेट्रोलच्या निर्यातीवरील टॅक्समध्ये १.५ रुपये प्रति लीटर, डिझेलच्या निर्यातीवर १३.५० रुपये प्रति लीटर आणि एव्हिएशन टरबाइन फ्युएल (ATF) वर ९.५ रुपये प्रति लीटर इतकी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे. या कपातीचा भारतातील घरगुती बाजारपेठेतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर कोणताही थेट प्रभाव पडणार नाही. सरकारने देशांतर्गत विक्रीसाठी लागणाऱ्या टॅक्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाचा तुटवडा भासू नये म्हणून सरकारने २७ मार्च २०२६ रोजी हा विशेष टॅक्स लागू केला होता.
दरम्यान, देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, जुनेच दर कायम आहेत. मात्र, देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर आधीच ११० रुपयांच्या पुढे गेले आहेत. सरकारने यापूर्वी देशांतर्गत एक्साईज ड्युटी कमी केली होती, त्यानंतर त्यात कोणताही बदल झालेला नाही.
CNG दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले…
महागाईचा झटका! CNG च्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर…
महागाईचा भडका! देशात पेट्रोल-डिझेलचे दर 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले; पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! दहा दिवसांत तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर…
पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ नंतर सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या….
पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…
राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…
पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी