मुंबईः राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री हे आता व्हीएसआरचे विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्य करण्यात आल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांसह इतर नेतेही या विमान अपघाताबाबत अनेक संशय निर्माण करत आहे. त्यातच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे आक्रमक झालेले आहे. डी जीसी एच्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी, तसेच व्हीएसआर कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या व्हीआरएस कंपनीबाबत सातत्याने नवंनवीन दावा करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर व्हीएसआर कंपनीचे विमान न वापरण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी या संदर्भात एकनाथ शिंदेंकडून सूचना केल्या होत्या. अशातच या मागणीचे गांभीर्य लक्ष्यात घेता हि मागणी मान्य केली आहे. त्यामुळे यापुढे शिंदे गटाचे नेते, मंत्री व्हीएसआरचे विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकीच तत्परता व्हिएसआर (VSR) संदर्भात का दाखवली जात नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कंपनीची विमान ना दुरुस्त होती हे त्यांनी आता मान्य केलंय. नियुक्त केलेले पायलट साहिल मदन आणि यश को-पायलट हे आता कुठे आहेत? असे अनेक सवालही आमदार मिटकरींनी यावेळी उपस्थित केले आहेत.
अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…
रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, तोपर्यंत शर्टचं बटण…
अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार
अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…
अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…
अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…
काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…
अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…
रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…
अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…
अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…
अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…