पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ नंतर सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या….

petrol
Share

परभणी : परभणी शहर आणि जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून डिझेलचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक झळकल्याने शेतकरी आणि वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. ज्या पंपांवर डिझेल उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या आणि शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

परभणीतील काही पेट्रोल पंप चालकांनी डिझेल देण्यासाठी शेतकऱ्यांकडे चक्क ‘सातबारा’ उताऱ्याची मागणी सुरू केल्याने संतापाची लाट उसळली आहे. “सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या” अशी अट घालत पंप चालकांनी शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. रात्र-रात्रभर रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नसताना, आता या नव्या अटीमुळे शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. ही अन्यायकारक अट असून सरकारने यात पेट्रोलपंप चालकांना निर्देश देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी अशा अटींचा सामना करावा लागणे अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे पूर्वमशागतीची कामे रखडून संपूर्ण हंगाम धोक्यात येईल. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून खते, बियाणे आणि इंधन प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने हस्तक्षेप करून अशा पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्याची आवश्यकता आहे. शिवाय शेतकऱ्यांना खरीप तयारीसाठी आवश्यक असलेली खते बियाणे व इंधन प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी नवले यांनी केली.

राज्याचे कृषिमंत्री भरणे यांनी हे वृत्त फेटाळत चौकशीचे आदेश दिले आहेत. “डिझेलसाठी सातबारा मागणे निश्चितच चुकीचे आहे. मी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही; केवळ अफवांमुळे लोक घाबरून गर्दी करत आहेत. सध्या इंधनाचा खप २० टक्क्यांनी वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा असल्याचे स्पष्ट केले आहे,” असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. मात्र, मंत्र्यांच्या या दाव्यानंतरही परभणीतील इंधन डेपो आणि पंपांवरील रांगा कमी झालेल्या नाहीत.

पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, पाहा नवीन दर…

महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…

राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…

पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *