अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

ajit-pawar-plane-crash
Share

मुंबईः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज (शनिवार) एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी 2026 हा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार एक पोस्ट लिहिली आहे.

बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीजवळ विमान लँडिंगच्या तयारीत असताना विमान कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी त्यांना कॉल केल्याची व्हाट्सअ‍ॅप चॅट शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही. खूप वेदनादायी!’

दरम्यान, रोहित पवार यांनी १० आणि १९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हा अपघात घातपात असू शकतो का, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. तसेच नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) आणि VSR कंपनीच्या कथित निष्काळजीपणावरही त्यांनी बोट ठेवले. या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. रोहित पवार यांना या भूमिकेत अमोल मिटकरी यांचीही साथ लाभली आहे. दोन्ही नेत्यांनी या दुर्घटनेतील संभाव्य निष्काळजीपणाबाबत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले, म्हणाले, तोपर्यंत शर्टचं बटण…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…

काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…

अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…

रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…

अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…

अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *