मुंबई: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडीओंमुळे माझी प्रतिमा मलीन होत आहे. हे व्हिडीओ प्रत्येक राज्यात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिष्ठेचे नुकसान होत आहे. याप्रकरणी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली. रुपाली चाकणकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अशोक खरात प्रकरणात व्हायरल झालेल्या व्हिडीओसंदर्भात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (शुक्रवार) सुनावणी पार पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
अशोक खरात प्रकरणात 100 महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यावेळी माझ्या अशील महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. या प्रकरणानंतर माझ्या अशिलाने महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याप्रकरणात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एआय व्हिडीओ तयार करून व्हायरल करण्यात आले. या व्हिडीओंना 43 मिलियन व्ह्यूज मिळाले. प्रत्येक राज्यात हे व्हिडीओ व्हायरल केले आहेत, असे रुपाली चाकणकर यांच्या वकिलांनी सांगितले. या सुनावणीसाठी रुपाली चाकणकर स्वत: न्यायालयात उपस्थित होत्या. या प्रकरणातील प्रतिवादी असणाऱ्या पक्षाच्या वकिलांनी, हे व्हिडीओ कुठं आहेत हे व्हिडीओ आम्हाला मिळाले नाहीत असा प्रतिवाद केला. यानंतर रुपाली चाकणकर यांच्या वकिलांच्यामार्फत AI व्हिडीओंना न्यायालयाला माहिती देण्यात आली. या व्हिडीओंमुळे आमच्या प्रतिष्ठेला नुकसान होते, असे रुपाली चाकणकर यांच्याकडून न्यायालाय सांगण्यात आले. त्यावर या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जुलैला होईल, असे सांगितले.
दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने दैवी शक्ती असल्याचा दावा करुन अनेक महिलांवर त्याच्या ऑफिसमध्ये लैंगिक अत्याचार केले होते. याचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अशोक खरात हा रुपाली चाकणकर यांचा गुरु असल्याचे समोर आले होते. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे अनेक फोटो आणि मोबाईलवरील संभाषणाची माहिती समोर आली होती. या सगळ्यामुळे रुपाली चाकणकर आणि अजितदादा गटाची प्रचंड बदनामी झाली होती. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांना भेटून राज्य महिला आयोग अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
अशोक खरात प्रकरणावरील चित्रपटावर रुपाली चाकणकर संतापल्या…
चर्चांना उधाण! अजितदादा गेल्यानंतरचा पहिला वर्धपानदिन अन् रुपाली चाकणकर यांची दांडी…
संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न : रुपाली चाकणकर
अशोक खरात याची दुसरी बाजू माहीत नव्हती : रुपाली चाकणकर