पार्थ पवार यांचा ‘काश्मीर की कली’ सोबत साखरपुडा, कोण आहे कायनात धार…

parth-pawar-kainaat-dhar
Share

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र, राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांचा लवकरच साखरपुडा संपन्न होत आहे. अभिनेत्री मॉडेल कायनात धार हिच्याशी २९ जुलै पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. पुण्यातल्या फार्महाऊसवर त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पार्थ पवार आणि कायनात धार यांच्यातील नात्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांच्या लग्न समारंभातही पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार दिसली होती. तसेच याआधीही पार्थ पवार आणि कायनात धार मध्य प्रदेशात महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी एकत्र गेले होते. तेव्हाच खरे तर त्यांच्यातील प्रेम संबंधांची चर्चा झाली होती.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

पार्थ आणि कायनात धार यांची गेल्या काही वर्षांपासून मैत्री होती. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अखेर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्याच्या अखेरीस त्यांचा साखरपुडा पुण्यातील फार्महाऊसवर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

कायनात धार ही मूळची काश्मीरची आहे. कायनात धार मॉडेलिंग करीत असल्याचे सांगितले जाते. कायनातचे संपूर्ण शिक्षत दिल्लीत झाले. सध्या ती दिल्ली आणि मुंबईत राहत असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर मुंबईत सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. शोकसभेला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजर होती. कायनात धारही पवार कुटुंबाच्या दुखा:त सहभागी झाली होती. पवार कुटुंबातील रेवती सुळे आणि उद्योजक सारंग लखानी यांचा विवाह मुंबईत अत्यंत थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात कायनात धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत प्रवेश केला. हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर, राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

कायनात केवळ आनंदाच्या प्रसंगातच नाही, तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्यासोबत उभी राहिलेली दिसली. अजित पवार यांच्या निधनानंतर कायनात धार बारामतीत पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचली होती. इतकेच नव्हे तर, मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही तिने हजेरी लावली होती. पार्थ पवारांसोबत अनेकदा दिसणे, पवार कुटुंबाच्या विविध कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणे, तसेच रेवती सुळेच्या विवाह सोहळ्यातील उपस्थिती यामुळे कायनात धार सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, तिचे आणि पवार कुटुंबाचे नेमके संबंध काय आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या चर्चांना अधिकच रंग चढला आहे.

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

पवार कुटुंबात गेल्या वर्षी दोन विवाहसोहळे संपन्न झाले. सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह पुण्याच्या ऋतुजा पाटील यांच्याशी झाला. दोघे ५ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. तसेच अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाग मुंबईतील तनिष्का कुलकर्णी हिच्याशी झाला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचा लग्नसोहळा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच पार पडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांच्या एन्ट्रीने सगळ्याचं लक्ष वेधलं होते. पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार देखील उपस्थित होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि कायनात धार देखील रेवती सुळेंच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिली. यानंतर पार्थ पवार आणि कायनात धारची चर्चा रंगली होती.

पार्थ पवार X छगन भुजबळ! अजितदादा किंवा आजोबांनीही कधी अशा पद्धतीने मला…

पार्थ पवार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

Video: पार्थ पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून शपथ! पण कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे…

रेवती सुळे यांच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी; पाहा मान्यवरांची यादी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *