अजितदादांसारखी स्टाईल! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सरकारी रुग्णालयात धाड…

ajit-pawar-sunetra-pawar
Share

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची स्टाईल, कामाचा धडाका आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड महाराष्ट्राला परिचित होती. कामचुकारपणा, बेशिस्तपणा आणि अस्वच्छता ते कदापि खपवून घेत नसतं. त्यामुळेच, बारामतीमध्ये अगदी सकाळी सकाळीसुद्धा सर्वकाही शिस्तबद्ध आणि स्वच्छ असायचं. येथील शासकीय संस्थेत एक शिस्त होती, अजित पवारांचा दरारा होता. आता, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीत अजित दादांची स्टाईल पाहायला मिळाली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छतेची स्थिती, औषधांचा पुरवठा तसेच एकूण व्यवस्थापनाची सखोल माहिती घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत जबाबदारीने व तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही दिल्या.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

रुग्णालयाची पाहणी करताना सुनेत्रा पवार यांना काही ठिकाणी अस्वच्छता दिसून आली, त्यावेळी तेथील कर्मचारी महिलांना त्यांनी चांगलच झापलं. ही काय घाण आहे, इथं उशी पडलेली दिसतेय. काय करता दिवसभर, फक्त मोबाईल बघता का? अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तसेच, येथील डॉक्टरांसह अधिकाऱ्यांनाही दम भरला. रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले.

दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम सुनेत्रावहिनी करत असल्याचे या भेटीतून पुन्हा एकदा दिसून आले. जनतेच्या प्रश्नांबाबतची तत्परता, कामातील शिस्त आणि प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्याची पद्धत यामुळे आज अनेकांना त्यांच्यामध्ये अजितदादांचे प्रतिबिंब दिसत आहे. आगामी काळात बारामतीच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक आणि लोकाभिमुख बदल घडवून आणण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजकीय नाट्यात मोठा ट्विस्ट…

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा दिला राजीनामा; नियम काय सांगतो पाहा…

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…

अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *