विरोधकांना इशारा! माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात…

sanjay-dina-patil
Share

मुंबईः माझं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी कोणतंही वैर नाही, त्यांच्यामुळे मी खासदार झालो आहे. पण कोणी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांनी स्वत:चा मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवावा. माझ्या नादाला लागाल तर एकतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात जाल, असा आक्रमक भाषेत ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

संजय दिना पाटील यांनी सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘ऑपरेशन तुडवा’ राबवण्याच्या तयारीत असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांना सावधानतेचा इशारा दिला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

संजय दिना पाटील म्हणाले, ‘मला पोलीस संरक्षण नको ही माझी विनंती आहे. पोलीस माझ्यासोबत असतील तर मी त्यांना कसा मारु शकतो, पोलीस मला अडवतील. मी वाट बघतोय, पोलीस माझ्यासोबत नसावेत आणि ते लोक हल्ला करायला येऊ देत, म्हणजे मी त्यांना मारु शकेन. मला त्यांच्यापासून भीती नाही, माझ्यापासून त्यांना भीती आहे. पोलीस नसले तरी आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. एकदा असं झालं होतं, तुमच्या आजोबांच्या काळातील लोक असतील तर त्यांना विचारा. तेव्हा माझ्या वडिलांच्यावेळी काहीजण हल्ला करायला आले होते, तेव्हा पाच लोकं आम्ही मारले होते. ते काही भाई लोकांच्या जीवावर असतील पण आम्ही स्वत:च्या जीवावर लढणारे आहोत.’

यावेळी संजय दिना पाटील यांनी ठाकरे गटातील एका नेत्याविषयी म्हणाले, या व्यक्तीने माझ्या घरासमोर येऊन शिव्या दिल्या. त्याने घरासमोर येऊन माफी मागितली तर मी मातोश्रीवर यायला तयार आहे, असे मी उद्धव ठाकरेंना सांगितले होते. मी विभागप्रमुख म्हणून त्याला खूप आदर दिला. त्याची कुत्र्यासारखी अवस्था आहे, तो लोकांना सर्वांदेखत शिव्या देतो. मला चार लोकांसमोर शिव्या द्यायची त्याची हिंमत नाही. दादा लोकांच्या जीवावर वाघ बनणं सोडून द्या. आमच्या नादाला लागाल तर घरात घुसून मारु. तुम्ही कितीही सुरक्षाव्यवस्था ठेवा, मी बॉम्ब टाकेन, असेही संजय दिना पाटील म्हणाले.

गद्दारांना कोणतीही भूमिका नसते; ओम निंबाळकर हे नामचिन गद्दार : संजय राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *