मुंबईः शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कॅप्टन अशोक खरातप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.
अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…
सुषमा अंधारे म्हणाल्या, एका पीडितेने सांगितलं की, ‘रुपाली चाकणकर देखील तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यावेळी रुपाली चाकणकरांनी स्वत:च्या हाताची अनामिका देखील कापली होती. 2 सप्टेंबर 2024 ला रोजी सोमवती अमावस्या होती. यादिवशीच रुपाली चाकणकरांनी हाताची अनामिका कापली. रुपाली चाकणकरांचे यादरम्यानचे फोटोही माध्यमांसमोर दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या हाताच्या अनामिकावर सफेद कापड गुंढाळल्याचं दिसून येत आहे.’
रुपाली चाकणकरांवर अनामिका कापल्याचा आरोप करताना ते नेमकं का केलं?, याबाबतचा पुरावा देखील वाचून दाखवला. तंत्रमंत्र विद्येत अनामिका का कापतात?, याबाबतही सुषमा अंधारेंनी सांगितले. अनामिका का कापतात?, हे मला माहिती नव्हतं. त्याबाबतची माहिती शोधली. त्यावेळी मला धक्कादायक कारण समजली. तंत्र-मंत्र विद्येत हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषली जाऊ शकते. अनामिकेचे महत्त्वः ही बोट सूर्य (यश) आणि शुक्र (आकर्षण) यांच्याशी जोडलेली आहे, ज्यामुळे ती मंत्रोच्चाराद्वारे ऊर्जा प्रवाहित करण्याचे साधन बनते.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या. चाकणकरांचा घरात खरातची भाची राहते, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा, रुपाली चाकणकरांची समोरासमोर चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, हे सगळ करण्याअगोदर त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली. रूपाली चाकणकर फरार होण्याअगोदर त्यांचा राजकीय दबाव वापरू शकतात. त्यांनी आपल्या पदाचा दुर्गोपयोग करत अनेकांवर दबाव आणला. काही पीडित म्हणतात, चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता धमकी देत होत्या. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच कोणत्यावेळी काय बोलण झालं हे समोर येण गरजेचं आहे. खरातने काही लोकांची मदत मागितली का? हे समोर येणं गरजेचं आहे. पोलिसांबरोबर आर्थिक गुन्हे शाखेने खरात आणि रुपाली चाकणकर यांचे संपत्तीचे स्रोत तपासले गेले पाहिजे. खरातची संपत्ती परदेशात देखील आहे. रुपाली चाकणकरांना तात्काळ ताब्यात घ्यावे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
खळबळजनक दावा! अजितदादांच्या घराबाहेर कथित जादूटोण्यामागे अशोक खरात…
रुपाली चाकणकर फरार, बजाव टाली; महिला नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ…
मुख्यमंत्र्यांच्या हाती फाईल अन् अशोक खरातभोवती फास आवळला…
रुपाली पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर खळबळजनक आरोप; 58 Video…
मोठी खळबळ! भोंदूबाबा अशोक खरातला अटक; 58 आक्षेपार्ह व्हिडीओ, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
नाशिकच्या ‘कॅप्टन’ मांत्रिकाला अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडीओ अन् राजकीय नेते…
अजितदादा विमान दुर्घटनेवरुन रोहित पवारांचा गौप्यस्फोट; माझ्याकडे मोठी माहिती…