नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे? यावर सध्या सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाने आपली बाजू न्यायालयापुढे मांडली असून, आता शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाने अगोदर न्यायालयापुढे अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
शिंदे यांची बाजू मांडणारे वकील नीरज कौल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे पूर्णपणे समर्थन केले आहे. राजकीय पक्षातील फुटीनंतर पक्ष कोणाचा हे आयोग ठरवतो. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे नेते म्हणजेच मूळ शिवसेना असा युक्तिवाद करत ठाकरे गटाच्या युक्तिवादाचीही चिरफाड केली आहे.

सु्प्रीम कोर्टात आज (बुधवार) झालेल्या सुनावणीत नीरज किशन कौल यांनी आपल्या युक्तिवादाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर मत व्यक्त केले. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, आमची बाजू ऐकून न घेताच घाईत निर्णय घेऊन टाकला, असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला होता. हाच युक्तिवाद कौल यांनी खोडून काढला. निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका योग्य आहे. ठाकरे गट वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने ठाकरेंची बाजू वेळोवेळी ऐकून घेतलेली आहे, असे कौल आपल्या युक्तिवादात म्हणाले.
2013 मध्ये ‘पक्षप्रमुख’ हे पद शिवसेनेच्या रचनेत अस्तित्वात होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ हे पद काही काळ ‘फ्रीझ’ करण्यात आले होते. ज्यांनी पक्ष उभा केला आणि त्यासाठी मोठे कष्ट घेतले, त्यांच्या स्मरणार्थ पदाबाबत ही भूमिका घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ‘प्रमुख’ पदाची रचना पुन्हा अस्तित्वात आले. बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुखपद गोठवलं गेले आयोगाने सांगितलेलं ठाकरेंनी ऐकले नाही. राजकीय पक्ष कोणासोबत आहे हे अध्यक्षांनी तपासायला सांगितले होते. लोकांच्या मताशिवाय पक्षात लोकशाही कशी असेल? असा सवाल निरज किशन कौल यांनी युक्तिवादात उपस्थित केला आहे.
निवडणूक आयोगाने अधिकाराचा वापर केलाय ठाकरे काँग्रेससोबत गेले म्हणून पक्षात असंतोष होता हीच एकनाथ शिंदेंची भूमिका होती. ठाकरेंचा युक्तिवादच चुकीच्या मुद्द्यांवर आधारे केला गेला. बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षात अचानक बदल केले गेले. अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवेळी निवडणुका आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने सांगितलेल्या गोष्टी ठाकरे यांनी केल्या नाहीत, असेही निरज किशन कौल म्हणाले.
शिवसेना कोणाची? शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत…
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बल यांनी थेट घावच घातला, धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवा…
शिवसेना कोणाची? कपिल सिब्बलांकडून तगडा युक्तिवाद, न्यायालय म्हणाले…
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बल यांनी कोर्टाला दिला थेट पुरावाच…
शिवसेना कोणाची? सिब्बलांचे एकापेक्षा एक बिनतोड युक्तिवाद तर नार्वेकरांनी आधीच सांगितला ‘निकाल’…
One thought on “शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून ठाकरेंच्या युक्तिवादाची चिरफाड…”