मुंबई सहकारी बोर्डात सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध…

Share

मुंबई: मुंबई सहकारी बोर्डाच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीत, ‘सहकार पॅनेल’च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील एकजूट, परस्पर विश्वास आणि संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी दाखविलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

सर्व घटकांना विश्वासात घेऊन मुंबई सहकारी बोर्डाच्या माध्यमातून सहकार चळवळीला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप देऊ, असा विश्वासही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ टी. कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलच्या उमेदवारांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली.

नवनिर्वाचित संचालकांमध्ये अनिल गजरे, मिलिंद टी. कांबळे, अंकुश रामचंद्र जाधव, अमोल श्रीपती खरात, नितीन धोंडीराम बनकर, सतीश दत्ताराम सावर्डेकर, विजय गोविंद जाधव, शंकर काशिनाथ अय्यप्पा, बाळासाहेब दिनकर घाडगे, मिलिंद गोविंद राऊत, श्रीधर विश्वनाथ जगताप, किशोर दत्तात्रय पाटणकर, प्रवीण डिकले, सुरेश विठ्ठल भालेराव, विठ्ठल ज्ञानेश्वर वाळुंज, जयंत लक्ष्मण शिरसिकर, मदन दादासाहेब यादव, अनिषा माजगावकर आणि वर्षा माळी यांचा समावेश आहे.

या निवडीबद्दल प्रकाश दरेकर, नगरसेवक तथा अध्यक्ष, मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन लि.; विठ्ठलराव भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कन्झ्युमर्स फेडरेशन लि.; सुनील बांबुळकर, अध्यक्ष, मुंबई-कोकण विभागीय मजूर सहकारी संघ यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!