पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अद्याप दहा दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेने एक अजब निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात शोककळा सुरू असताना अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणं कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
पुणे महानगरपालिकेने काढलेल्या निर्णयात नेमकं काय म्हटले पाहा…
कामगार कल्याण विभाग,
पुणे महानगरपालिका.
जावक क्र. एलओ / 8006 दिनांक : 03/02) 202E
विषय – दिनांक 15 फेब्रुवारी, 2026 पुणे महानगरपालिका वर्धापन दिन पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे आयोजित कार्यक्रम
पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कलामंचातर्फे दि.15 फेब्रुवारी, 2026 पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त अधिकारी/सेवकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये नृत्य (वैयक्तिक व समुहनृत्य), नाटक, ऑर्केस्ट्रा (हिंदी व मराठी गितांचा कार्यक्रम), वादन, वैयक्तिक कलागुण व छायाचित्र / हस्तचित्र/ कलाकृती प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी, ज्या अधिकारी/सेवकांना वर नमूद केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी दिनांक 10/02/2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपली नावे कामगार कल्याण विभागाकडे खालील तक्त्यामध्ये पाठवावित. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण अन् खळबळजनक दावा…
अजित पवार यांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल, म्हणाला…
अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले अन् 10 दिवसात…