ट्रोक करणाऱ्यांना इंदुरीकर महाराजांचा टोला; लेकीच्या लग्नात सगळच सांगितलं…

indurikar-maharaj-daughter
Share

संगमनेर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल यांच्याशी रविवारी (ता. ३) मोठ्या थाटा माटात संपन्न झाला. यावेळी इंदुरीकर महाराजांनी साखरपुड्यावरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांसह अनेकांवर टीक केली. प्रथमच मुलीच्या लग्नाच्या दिवशी इंदोरीकर महाराज स्पष्ट बोलले. जशी साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, तशी विवाहाची चर्चा वर्षभर होईल, असे मत इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केले.

लग्नात मी मठ्ठा, गुलाबजाम केले नाहीत. मराठमोळं आणि सात्विक जेवन ठेवलं होतं. आज मुलगा, मुलगी मोठी झाली ते दिसत आहे. मी किर्तनासाठी फिरत असल्याने त्यांची भेट होत नव्हती. माझ्या मुलाची देखील तीन वर्ष झालं भेट झाली नाही. मी विद्यालय चालवतोय. एक रुपया घेत नाही. 13 शिक्षक आहेत असं इंदुरीकर म्हाराज म्हणाले. आता प्रश्न विचारला जाईल, एवढा पैसा कुठून आला? माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला आहे. देणाऱ्यांनी दिलंय त्यामुळं ट्रोल करण्याचा कोणाला अधिकार नाही, असे स्पष्टीकरण इंदुरीकर महाराज यांनी दिले. नास्तिक लोक त्यांचा मुळ स्वभाव सोडत नाहीत. एवढं प्रेम टिकवलं तसंच मुलाप्रमाणे शेवटपर्यंत टिकवावे अशी विनंती देखील इंदुरीकर महाराजांनी यावेळी केली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

इंदुरीकर महाराज यांनी गेल्यावर्षी कन्येचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला होता. साखरपुड्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावरून त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली होती. दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात, असं म्हणत त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठवण्यात आली होती. इंदुरीकर महाराज वैयक्तिक टीकेमुळे व्यथित होत, थेट कीर्तनसेवा थांबवण्याचा मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. इंदुरीकर महाराजांनी, ‘लग्न जोरात करणार, काय बोंबलायचं बोंबला’, असं म्हणत टीकाकारांना आव्हान दिले होते. अशातच मोठ्या थाटा माटात इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

इंदोरीकर महाराज विद्यालय चालवत असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे. एकीकडे भव्य विवाहसोहळा तर दुसरीकडे शिक्षणासाठीचे निःस्वार्थ काम या दोन्ही गोष्टींमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

इंदुरीकर महाराज म्हणाले, मुलगी ही दरिद्री मुलाच्याच नादाला लागते अन्…

इंदुरीकर महाराज नवीन व्हिडीओमध्ये म्हणाले; काय बोंबलायचंय बोंबला, आता तर…

इंदुरीकर महाराज ट्रोलिंगने हैराण; कीर्तन सोडण्याचा निर्णय…

इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर…

Video: इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा थाटात साखरपुडा, काय करतो होणारा जावई, नेटीझन्सची टीका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *