Gen Z हा शब्द मला काही कळला नाही : इंदुरीकर महाराज

indurikar-maharaj
Share

मुंबईः नीट पेपर लिक प्रकरणी Gen Z अर्थात तरुणांनी केलेल्या देशव्यापी आंदोलनामुळे केंद्र सरकारला झुकावं लागलं. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. Gen Z बद्दल प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी भाष्य केले आहे.

मराठी वृत्तवाहिनी झी २४ तासला लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी वारीच्या निमित्ताने विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या लग्नापासून ते कीर्तनामध्ये होणाऱ्या गंमतीजमंतीबद्दल भाष्य केले. यावेळी, Gen Z तरुणाईबद्दल इंदुरीकर महाराज यांना विचारलं, त्यावर त्यांनी खास उत्तर दिले. ते म्हणाले, ‘Gen Z हा शब्द मला काही कळला नाही, पण हे पोरंचं आमचा मोठा वर्ग आहे. तरुण पोरं मोठ्या प्रमाणात किर्तनला येतात, किर्तन ऐकतात. भरपूर प्रमाणात तरुण पोरं ऐकत असतात.’

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

‘तळागाळातला एक विद्यार्थी शिकावा म्हणून मी २००५ साली एक माध्यमिक शाळा सुरू केली. त्यावेळी खूप अडचणी आल्या होत्या. ५ ते १०पर्यंत आलेल्या मुलांकडून एक रुपया सुद्धा फी घेतली नाही. चाचणीची फी नाही, स्कॉलशीपची फी घेतली नाही. २००५ पासून आतापर्यंत १५०० पोरं शिकून गेली. फक्त दाखल्याची फी घेतली, असेही इंदुरीकर महाराज यांनी सांगितले.

ज्या मुलांचं कुणी आधार नाही, अशा मुलांसाठी बालगृह सुरू केलं आहे. सध्या ६० मुलं आहे. त्या ६० मुलांचे केस कापणे, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. आज मी ५०० मुलांचा पालक आहे. पण, यातली मुलं ही वीट भट्टीवर काम करणारी पोरं आहे, जर ती पोरं शिकली नसती तर काही झालं नसतं. आपल्याकडून गरिबाची पोरं १० वी शिकून गेली, त्यांचा सुखी संसार झाला हा आशिर्वाद आहे. एक मुलगा इंजिनिअर आहे, एक मुलगी एसपी आहे. १५ ते २० मुलं पोलीस दलात आहे, असेही इंदुरीकर महाराज यांनी अभिमानाने सांगितले.

ट्रोक करणाऱ्यांना इंदुरीकर महाराजांचा टोला; लेकीच्या लग्नात सगळच सांगितलं…

इंदुरीकर महाराज म्हणाले, मुलगी ही दरिद्री मुलाच्याच नादाला लागते अन्…

इंदुरीकर महाराज नवीन व्हिडीओमध्ये म्हणाले; काय बोंबलायचंय बोंबला, आता तर…

इंदुरीकर महाराज ट्रोलिंगने हैराण; कीर्तन सोडण्याचा निर्णय…

इंदुरीकर महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर…

Video: इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा थाटात साखरपुडा, काय करतो होणारा जावई, नेटीझन्सची टीका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *