पुणे: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठलेला असताना, आता आणखी एक महागाईचा झटका बसला आहे. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ‘CNG’च्या किमतीत प्रति किलो थेट अडीच रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे आता वाहनचालकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार असून, नवे दर गुरुवारी (ता. २८) मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आले आहेत.
‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ने (MNGL) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस खरेदीच्या मूळ किमतीत वाढ झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या अवघ्या २० दिवसांत सीएनजीच्या दरात प्रति किलो तब्बल ४ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट फटका पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या आयटी हब परिसरातील लाखो वाहनधारकांना बसणार आहे. सीएनजीच्या दरात झालेल्या या वाढीनंतर तो आता ९४ रुपये ७५ पैसे प्रति किलोवर पोहोचला आहे. सीएनजीचे दर वाढले असले, तरी सुदैवाने घरगुती पाइप गॅसचे (PNG) दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. लागोपाठ होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे पुण्यातील रिक्षा संघटना आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, यामुळे वाहतूक भाडे वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
नाशिकमध्ये (Nashik) सीएनजीचा दर 1.35 रुपयांनी वाढला आहे. यापूर्वी नाशिकमध्ये एक किलो सीएनजी गॅस भरण्यासाठी 95.15 रुपये लागत होते. हा दर आता वाढून 96.50 रुपये इतका झाला आहे. सीएनजी हा किफायतशीर इंधनाचा पर्याय मानला जातो. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेकांनी सीएनजी वाहने वापरायला सुरुवात केली आहे. मात्र, महागाईच्या तडाख्यातून आता सीएनजीही सुटलेला नाही. त्यामुळे आता सीएनजी वाहनधारकांनाही दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. सीएनजीच्या दरात 9 मे रोजी 1.50 रुपये वाढ झाली होती. मे महिन्यात ही दरवाढ दुसऱ्यांदा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत सीएनजीचे दर वाढले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रातही सीएनजीचे दर वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. ही शक्यता आता खरी ठरली आहे.
दरम्यान, दरवाढ झाली असली, तरी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाराच असल्याचा दावा ‘एमएनजीएल’ने केला आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, पेट्रोल कारच्या तुलनेत ४८ टक्के आणि डिझेल कारच्या तुलनेत २६ टक्के पैशांची बचत होते. पेट्रोल रिक्षाच्या तुलनेत सीएनजी वापरल्यास आजही २६ टक्के नफा किंवा बचत होते.
महागाईचा भडका! देशात पेट्रोल-डिझेलचे दर 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले; पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! दहा दिवसांत तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर…
पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ नंतर सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या….
पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…
राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…
पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी