नाशिक : नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बीपीओ युनिटमधील कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणावरून राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. TCS प्रकरणावर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) चा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नाशिक प्रकरणाची दखल घेत 50 पानांहून अधिकचा अहवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे.
अहवालात कार्यस्थळी लैंगिक छळ, मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि POSH कायद्याच्या शून्य अंमलबजावणीचे गंभीर आरोप नोंदवले आहेत. आरोपींकडून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक, मानसिक आणि भावनिक छळ झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हिंदू धर्म, परंपरा आणि श्रद्धांचा अपमान करुन महिलांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात करण्यात आला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, तक्रार केल्यास बदली आणि नोकरी गमावण्याची भीती दाखवल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. POSH समिती पूर्णपणे निष्क्रिय असून नाशिक कार्यालयात कोणतीही जागरूकता व्यवस्था नव्हती. CCTV बसवलेले असले तरी ते बंद अवस्थेत असल्याचे आयोगाच्या निदर्शनात दिसून आले आहे. NCW ने पोलिसांना Witness Protection Act अंतर्गत तक्रारदारांना संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने संबंधित आरोपींवर BNS कलम 75, 78, 79 आणि 299 अंतर्गत कारवाईची शिफारस केली असून टीसीएस व्यवस्थापनावरही कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, नाशिकमधील टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप याच कंपनीतील 8 महिलांनी केले आहेत. या प्रकरणामध्ये नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, पीडित महिलांनी या एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या कंपनीत काम करणारे कर्मचारी, एचआर विभागातील कर्मचारी आणि डिलिव्हरी पार्टनर अशा आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बळजबरी, लैंगिक शोषण, लग्नाचे आमीष दाखवून फसवणूक, धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे अनेक आरोप पीडित महिलांनी केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन महिलांसह एकूण 8 जणांवर कारवाई करण्यात अटक करण्यात आली आहे. कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक! अशोक खरात याच्या विकृतीचा नवा Video समोर…
नाशिकच्या अशोक खरातची कुंडली बाहेर; महिलांचं योनी शुद्धीकरण…
नाशिकच्या राजकारणात एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल; मोठी खळबळ…