अजितदादांच्या अपघातावर VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब…

ajit-pawar-plane-crash
Share

पुणे: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी धक्कादायक जबाब नोंदवला आहे. व्ही.के.सिंग यांची तीन दिवस सीआयडी चौकशी झाली. या चौकशीत अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी पायलट सुमित कपूरची चूक आहे. यात माझी कीहीही चूक नाही. माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असा खळबळजनक जबाब व्ही.के.सिंग यांनी सीआयडीकडे नोंदवला आहे.

रोहित पवार म्हणाले, ‘अजितदादांच्या विमान अपघाताचा केवळ तपास सुरु असल्याचे CID कडून सांगण्यात येतंय. AAIB च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर तर काय बोलावं हेच कळत नाही, कधी ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून तर कधी डेटा रिकव्हर केला म्हणून बातम्या पेरल्या जातात. तपास यंत्रणेकडून याबाबत मिठाची गुळणी धरली जाते. ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं हेच अद्याप बाहेर आलं नाही, तर मग अपघात झाल्यानंतर काही वेळेतच VSR कंपनीचा मालक व्ही.के. सिंग याला कसं कळलं की पायलटची चूक आहे? हा महाशय पायलटची चूक असल्याचं सांगून स्वतः मात्र हात वर करुन मोकळा होत असेल. तर कदाचित तोफेच्या तोंडी दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र नामनिराळं राहण्याचा त्याचा डाव दिसतोय. पण अजितदादांच्या अपघाताबाबत यंत्रणेकडून जोपर्यंत ठोस आणि विश्वासार्ह माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत कुणीही कोणताही आधार नसलेल्या चर्चेवर विश्वास ठेवू नये.’

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अजित पवारांच्या विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी कोसळल्याची माहिती मिळाल्याचं अहवालात नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं. त्यानंतर जमिनीवर कोसळलं. ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3 हजार मीटर दृश्यमानता होती,असं अहवालात नमूद करण्यात आलं. तर, उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं, असंही अहवालात म्हटलंय. मात्र, बारामती विमानतळावर सुविधा अपुऱ्या असल्याचा ठपका, या अहवालात ठेवण्यात आला आहे.

पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली: रोहित पवार

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता मोठे वळण…

अजित पवार यांच्या घातपाताचा संशय! राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग…

रोहित पवार यांच्याकडून विमान अपघात अहवालाची चिरफाड; विमानाची रेकी…

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पहिला अहवाल समोर; धक्कादायक माहिती…

अजितदादांना जाऊन एक महिना झाला, रोहित पवार यांची हृदयद्रावक पोस्ट…

अजितदादांसाठी रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलिस ठाण्यात जाणार; मुंबईत नाही घेतली FIR…

अजित काकांसाठी आम्ही लढत राहू, मराठी माणूस दाखवून देऊ: रोहित पवार

अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *