मुंबईः अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. थातूरमातूर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देऊ, असा इशारा रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे. गेल्या महिन्याभरात काय तपास केला ते सांगा. सीबीआयकडे आधीच तपासासाठी खूप प्रकरणे आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे असतील, लहान-सहान कार्यकर्ते असतील, सगळे सातत्याने बोलत आहेत. पायलट संदर्भात बोलत असताना आम्ही पण डिटेल बोललो आहोत. माझी पण इच्छा आहे की, पारदर्शक तपास व्हावा. सीबीआय तपास दिला गेलाय. गेल्या महिन्याभरात त्यांनी काय तपास केलाय, सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले का? क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे ते केले का? सखोल चौकशी करणं महत्त्वाचे आहे. दोन थातूरमातूर रिपोर्ट दिले गेले. सत्तेतील लोकांचे आणि व्हीएसआरचे कसे संबंध होते? मंत्र्यांचे संबंध व्हीएसआरसोबत कसे होते याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सीबीआय तपास होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आतापर्यंत 7 हजार 75 केसेसचे निकाल दिले गेले नाहीत. बर्फात आणि फ्रिजमध्ये केसेस टाकायच्या असा हा प्रकार आहे. सीबीआयला केस देताना कालमर्यादा देण्याची गरज आहे.’

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पत्र तयार केले आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेत आम्ही पत्र आणि पुरावे देऊ. सीएमच्या अंतर्गत सगळेच प्रश्न सुटेल असे नाही. अमित शहा यांना आम्ही रिपोर्ट पाठवले आहेत. डीजीसीएला पण रिपोर्ट पाठवले आहेत. आधीही आम्ही सीएमला रिपोर्ट देणार होतो आणि आता देखील आम्ही तेच सांगतोय, आम्ही रिपोर्ट देऊ. 70 टक्के माहिती आम्ही मागे ठेवली आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही, योग्य पद्धतीने तपास व्हावा. ‘ब्लॅक बॉक्स किती जळला याचा देखील पुरावा आमच्याकडे आहे. श्वेता सिंह कशा भ्रष्टाचार करत आल्या आहेत, त्यासंदर्भात देखील तपास व्हायला पाहिजे. थातूरमातूर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देऊ. गेल्या महिन्याभरात काय तपास केला ते सांगा, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले, ‘अजित काकांसाठी आम्ही लढत राहू. नेमकं काय घडलं? हे महाराष्ट्राला माहिती झालं पाहिजे. अजितदादा मला मिश्किलपणे टोमणे देखील मारायचे. रुबाबात येत असायचे, अधिवेशनात येणारे पहिले नेते अजित पवार असायचे आणि सर्वात उशिरा जाणारे नेते देखील अजित पवारच असायचे. एक मराठी नेता, शिस्तप्रिय अनुभवी नेता आता आपल्यात नाही. काहीही झालं तरी लढत राहू आणि लोकांचे मुद्दे मांडत लढत राहू.ट
राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांना 60 वर्ष राजकीय कारकिर्दीत झाले आहेत. त्यांचा राज्याला आणि देशाला फायदा होऊ शकतो. अजित पवार यांची देखील तीच इच्छा होती. आमच्या पक्षाची देखील इच्छा आहे. राऊत साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष आणि पवार साहेबांसोबत या निवडणुकीबाबत बोलले जाईल. पवार साहेब मुंबईत आल्यावर मविआतील नेत्यांसोबत बोलून निर्णय घेऊ. अजित पवार यांच्या पक्षासोबत यासंदर्भात संवाद होईल, असे वाटत नाही. कारण अजित पवार यांची इच्छा होती, मात्र आताच्या नेत्यांची इच्छा आहे का? हे माहित नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अजितदादांच्या घातपाताचा संशय, बारामतीमधील आणखी एक गाव बंद…
अजितदादा विमान अपघात प्रकरण! रोहित पवार यांचा दिल्लीत नवा गौप्यस्फोट…
अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…
काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड मला लागलंय; रोक सके तो रोक लो…
अजितदादांचं विमान पायलटने मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला…
रोहित पवार यांचा पुन्हा गौप्यस्फोट; अजितदादांच्या विमानाचा पुन्हा स्फोट का झाला…
अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…
अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…
अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…