नवी दिल्ली: अजित पवार यांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असे नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केले. रोहित पवार यांच्या या आरोपावर सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शब्द दिला आहे की, या सगळ्याची ते चौकशी करतील. रोहित पवार यांची अस्वस्थता सहाजिक आहे. त्याने अतिशय पारदर्शकपणे प्रश्न मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊन, पारदर्शक चौकशी करतील. त्यामुळे या चौकशीची वाट पाहू. तसेच रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत पूर्व विदर्भातल्या नेत्याचं नाव घेतलं आहे. मात्र त्याबद्दल मला माहिती नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
मी आणि सुनेत्रा वहिनी यापुर्वीही डीपीडीसीला एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर ही नवीन जबाबदारी आहे. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. मात्र अजितदादा नसल्याचं दुःखही आहे. अजितदादा नसण्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही. आजही खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही. आमचं कुटुंब सध्या अडचणीतून जात आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार यांची तब्येत खूप चांगली आहे. रूबी हॉल रूग्णालयाच्या स्टाफचे मी आभार मानते. शरद पवार यांना उद्या रुग्णालायातून डिस्चार्ज मिळू शकतो. शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधे होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केले होते. अजितदादानंतरच्या काळातही या सगळ्यांनी आमची साथ दिली त्याबद्दलही मी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…
अजित पवार अपघात प्रकरण! रोहित पवार दिल्लीत करणार मोठा खुलासा…
मोठी बातमी! अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवार यांनी घेतला तिघांवर संशय; थेट नावे सांगितली…
तीन अनुभव! अजित दादांचा फोन आला; दादा नक्कीच अजून आहेत…
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण अन् खळबळजनक दावा…
अजित दादांचा अपघाताच्या 8 मिनिटांआधी अखेरचा फोन, पाहा विमानातून काय म्हणाले…
विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर…, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय…
अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले अन् 10 दिवसात…