बारामती : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या ‘दशक्रिया विधी’ होणार नाही, असे त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले आहे. अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले असल्याने, आता यापुढे कोणताही वेगळा विधी केला जाणार नाही, असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, त्यांच्या उत्तरकार्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. ६ फेब्रुवारी रोजी त्यांचा दहावा दिवस (दशक्रिया विधी) होता. मात्र, श्रीनिवास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता दहावा किंवा १३व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, यावर अजित पवार यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती दिल्याचे आता सांगण्यात आले आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्यानंतर हे पद कुणाला द्यायचं, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यांनी ही माहिती फेटाळून लावली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी पक्षातील आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पेच सुरू असताना अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल, म्हणाला…
अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले अन् 10 दिवसात…
विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर…, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय…
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात अन् पायलटच्या मित्राची धक्कादायक माहिती…