मुंबई : अजित पवार यांचा तो शेवटचा विमान प्रवास आणि देवगिरी बंगल्यापासून ते विमानतळाच्या गेट नंबर ८ पर्यंतचा तो शेवटचा १ तास.. ज्या माणसासोबत तासाभरापूर्वी संवाद झाला, तेच अजितदादा अचानक आपल्याला सोडून गेले यावर आजही विश्वास बसत नाहीये…पण, त्या अखेरच्या प्रवासात अजितदादांच्या मनात नेमकं काय चाललं होतं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या का? राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुधीर राऊत हे अजित पवार यांच्या त्या शेवटच्या गाडी प्रवासात त्यांच्यासोबत असणारे एकमेव साक्षीदार होते. त्या प्रवासादरम्यान अजितदादांनी दिलेला तो मोठा शब्द आणि अपघाताच्या बातमीने बसलेला धक्का… काय घडलं होतं त्या १ तासात? याबाबत सुधीर राऊत सविस्तरपणे सांगितले आहे.
View this post on Instagram
सुधीर राऊत म्हणाले, अजित पवार यांचा विमान अपघात झाला. तत्पूर्वी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात मी एकमेव व्यक्ती त्यांच्यासोबत होतो. सकाळी ७ वाजता देवगिरीला त्यांनी बोलवलं होते. त्यांना बारामतीला लवकर जायचं होतं म्हणून मला सोबत विमानतळापर्यंत घेऊन गेले. प्रवासात मला त्यांनी १२ तारखेला आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत आहोत असे स्पष्टपणे सांगितले. साहेब आपल्यासाठी विठ्ठल आहेत, त्यामुळे आपण त्यांची माफी मागायची. झालं गेलं सोडून द्यायच आणि त्यांच्या नेतृत्वात ते सांगतील तसं काम करायचं असं त्यांनी मला सांगितले. मी एयरपोर्टला गेट नंबर ८ पर्यंत सोबत गेलो आणि तिथून शरद पवार यांना भेटायला पुन्हा माघारी सिल्वर ओकला आलो. माघारी आल्यानंतर सिल्वर ओक जवळ थांबलो होतो, त्यावेळी अजित पवार यांच्या अपघाताची बातमी कळाली. मला विश्वासच वाटला नाही. ज्या माणसासोबत १ तासापूर्वी होतो, तो आता हयात नाही यावर विश्वास बसत नव्हता.’
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघात झाला होता. ते जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत येत असताना ही दुर्घटना घडली. बारामती विमानतळानजीक असलेल्या गोजुबावी गावाच्या हद्दीत अजित पवारांचे चार्टर्ड विमान धावपट्टीवर कोसळले होते. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील वैमानिक, केबिन क्रू आणि अजितदादांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेबाबत घातपाताच्या शंका व्यक्त करण्यात आला आहेत.
एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता शरद पवारांनी फेटाळली
अजित पवार विमान अपघाताच्या तपासात प्रगती न झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांची नाराजी…
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या रिपोर्टसाठी लागणार वाट पाहावी…
बारामतीत अजितदादांचा अपघात झाला तिथंच आणखी एक विमान कोसळलं, वेळ तीच वेळ अन् गावही…
One thought on “अजितदादांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं…”