सातारा: सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण तापलं असून, पाल जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे. उंब्रज पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली. बाळासाहेब चोरेकर हे देवदर्शनावरून परतत असताना हा हल्ला झाला. मारहाण झालेल्या बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर इनोव्हा गाडीतून आले होते. त्यांनी गाडी अडवून चोरेकर यांना मारहाण केली. पाल जिल्हा परिषद गटातील वर्चस्वावरून हा वाद झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते उंब्रज पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे उमेदवार देवराज पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनीही पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. उद्या या गटासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच झालेल्या या मारहाणीमुळे पाल गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
राष्ट्रवादी विलिनीकरणावर नीलेश लंके यांचा मोठा दावा; अजित पवार गटातीलच कुणीतरी असुरक्षित होत
राज्यात अजित पवार यांच्या निधनामुळे शोककळा अन् पुणे महानगरपालिकेचा अजब निर्णय…
शरद पवार गटाचा मोठा निर्णय; प्रवक्त्यांना मौन पाळण्याच्या सूचना