जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषणाच्या 15व्या दिवशी मुंबईला जाण्याची घोषणा केली. मुंबईला जाण्यासाठीचा मार्ग जाहीर केला असून, अंतरवालीतून मुंबईला जाताना पोलीस आणि गृहमंत्र्यांनी आम्हाला अडवू नये, असे आवाहन जरांगे पाटील केले आहे. पोलिसांनी अडवल्यास जिथं अडवतील तिथं शांतपणे बसून राहण्याचं आवाहन केले.
आपला पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोद्यात होणार आहे. दुसरा मुक्काम अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यात होणार आहे. तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसरमध्ये होणार आहे. पुण्यातून कोणत्याही रस्त्यानं गेल्यानं मुंबईला जावं लागते. चौथा मुक्काम खोपोलीमध्ये होणार आहे, ते रायगड जिल्ह्यात आहे. खोपोली किंवा कोपरखैरणे यात चर्चा सुरु आहे. मात्र, खोपोली फायनल धरा, त्यानंतर आझाद मैदानात आमरण उपोषण केले जाईल.
View this post on Instagram
पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आहे, तिथल्या सगळ्या मराठ्यांनी कामाला लागावे. श्रीगोंदा तालुक्यातील सगळ्या मराठा समाजानं, हडपसर आणि पुणे शहर पूर्ण यांनी सगळ्यांनी हडपसरच्या तयारीला लागावे. रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईतील खोपोली आणि कोपरखैरणे येथील बांधवांनी कामाला लागावे. पाचव्या दिवशी सकाळी 10 वाजता आझाद मैदानला आमरण उपोषण सुरु करतोय.
अंतरवाली- शहागड- गेवराई -बीड-मांजरसुभा- लिंबा गणेश मार्गे पाटोदा या रस्त्यावरुन जे मराठा बांधव मुंबईसाठी चाललेत ते मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी चालले आहेत. आम्ही ज्या रस्त्यावरुन मुंबईला चाललोय, त्या मार्गावर जे मुंबईला येणार नाहीत त्यांनी आशीर्वाद द्यायला, वाटेला लावण्यासाठी यावे. समाजासाठी एक दिवस काढून आम्हाला आशीर्वाद देऊन माघारी घरी जावे. जी तारीख सांगणारे त्या तारखेला रस्त्यावर या. जी तारीख सांगितली त्या तारखेला काम बंद, नोकरी व्यवसाय बंद, तुमच्या अंगात मराठ्यांचं रक्त खेळतंय असं वागा. चिखलानं पाय भरले असले तरी शेतातून पळत या, आम्ही चाललेल्या मार्गावर आपल्या मुंबईला जाणाऱ्या लेकराला आशीर्वाद द्यायला रस्त्यावर या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मुंबईला बेमुदत आमरण उपोषण चालणार आहे, जे कायमस्वरुपी आंदोलनाला येणार आहेत, रॅलीत येणार आहेत, आपण सगळ्यांनी एकाच मार्गानं चालायचं आहे. कायमस्वरुपी जे मुंबईसाठी येणार आहेत त्यांनी ओव्हरटेक करायचं नाही, सांगितलेले शब्द विसरायचे नाहीत. शांततेनं मुंबईला जायचं आहे. कोणाला धक्का लागू नये, कट लागू नये, इजा होऊ नये. आपण जो मार्ग ठरवला आहे त्या मार्गानं सगळ्यांनी सोबत जायचं आहे. आपल्याला शांततेच्या मार्गानं आंदोलन करायचे आहे.
पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही बॅरिकेड टाकून अडवायचं नाही. आम्हाला लोकशाही मार्गानं शांततेत उपोषण करायचे आहे. लोकशाही मार्गानं शांततेत आमरण उपोषण करुन आम्हाला आमचा हक्क मिळवायचा आहे. मग तुम्ही अडवता कशामुळं तुम्हाला राज्य अस्थिर करायचं आहे काय? अडवलंच तर शांततेत बसून राहायचं, लांबलचक डांबरावर झोपायचं, बॅरिकेड लोटायचं नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट…
मराठ्यांचा मराठ्यांशी संघर्ष झाल्यास एकनाथ शिंदेच जबाबदारः मनोज जरांगे यांचा परखड इशारा
हैदराबाद जीआरनंतर एकही मराठा वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते – जरांगे पाटील
One thought on “मनोज जरांगे यांची मुंबईला जाण्याची घोषणा; मुक्कामाचे ठिकाण ठरलं; अडवलंच तर…”