ब्रिक्स शिखर परिषदेत ५० ऐतिहासिक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता

Share

नवी दिल्लीः आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत ५० हून अधिक महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या परिषदेच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता या चार प्रमुख स्तंभांवर आधारित आराखडे आणि कृती योजनांसह ५० हून अधिक ठोस आणि व्यावहारिक करार होती, असे अधिकृत सूत्रांनी येथे सांगितले.

भारतासाठीच्या प्रमुख परिणामांमध्ये दहशतवादाचा तीव्र निषेध आणि त्याच्या सर्व स्वरूपांचा मुकाबला करण्याची वचनबद्धता यांचा समावेश होता, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जागतिक प्रशासकीय संस्थांमध्ये सुधारणा करणे, बहुपक्षीयता मजबूत करणे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला पाठिंबा देण्यावरही एकमत झाले, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम आशियातील परिस्थितीवरून संयुक्त अरब अमिरात आणि इराण यांच्यातील मतभेदांमुळे शिखर परिषद संयुक्त घोषणेसह समाप्त होईल की नाही, यावर स्पष्टता नसली तरी भारताला अध्यक्षपदासाठी मिळालेला पाठिंबा पाहता सकारात्मक परिणामाची आशा असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. पश्चिम आशियातील मतभेदांमुळे यापूर्वीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठका संयुक्त निवेदनाशिवायच संपल्या होत्या.

विविध क्षेत्रांमध्ये काम करून आणि वर्षभरात ४०० बैठका घेऊन, भारताने सर्वांना एकत्र आणण्याची आणि एकमत घडवून आणण्याची क्षमता दाखवून दिली आहे. याचे परिणाम ब्रिक्स देशांतील लोकांना फायदेशीर ठरले आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘ग्लोबल साउथ’चा एक खंबीर आवाज म्हणून भारत उदयास आला आहे आणि त्याचे दृष्टिकोन व आकांक्षा उदयोन्मुख जागतिक व्यवस्थेमध्ये एकत्रित करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बहुपक्षीयता मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित असलेल्या सत्राने या शिखर परिषदेची सुरुवात होईल.

सरकारचा असा विश्वास आहे की, संवाद आणि रचनात्मक सहकार्यासाठी ‘ब्रिक्स’ला एक व्यासपीठ म्हणून स्थापित करून भारताने एक दुवा साधणारी भूमिका बजावली आहे. मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकांच्या सहमती दस्तऐवजांवरून हे स्पष्ट होते.

सरकारच्या मते, ब्रिक्स अध्यक्षपद हा संपूर्ण देशाचा सामूहिक प्रयत्न होता, ज्यामध्ये केंद्र, राज्ये, संस्था, उद्योग, शिक्षण क्षेत्र, युवक, नागरी समाज आणि समुदाय यांना एकत्र आणून ३० हून अधिक शहरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!