जिल्हा परिषद निवडणुकीचे काउंटडाउन सुरू; पाहा मतदान कधी…

election-commission
Share

मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्य निवडणूक आयोगात हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी जवळपास अंतिम टप्प्प्यात आली आल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ६ आणि ७ जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम उपलब्ध असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. मात्र, सध्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुंतलेले मनुष्यबळ मोकळे झाल्यानंतरच जिल्हा परिषदांसाठी मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे मतदानाच्या अंतिम तारखांवर आयोगाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

या बैठकीला जिल्हा परिषदांचे संबंधित अधिकारी तसेच पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक प्रक्रियेतील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान २५ जानेवारीच्या आसपास होण्याची दाट शक्यता आहे. आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेऊन मतदानाच्या तारखा ठरवण्यात येणार असून, २५ जानेवारी ही तारीख अडचणीची ठरल्यास २८ जानेवारी रोजी मतदान घेण्याचाही पर्याय चर्चेत आहे. २८ जानेवारी हा बुधवार असल्याने त्या दिवशी मतदान घेणे मतदारांसाठी अधिक सोयीचे ठरेल, असे मतही व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल…

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवा नियम, उमेदवारांचं वाढलं टेन्शन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *