चर्चांना उधाण! राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाने उडाली खळबळ…

ajit-pawar
Share

मुंबई: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी आंदेकर कुटुंबासह इतर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. यामुळे अजित पवार यांच्यावर सर्व बाजुंनी टीका होत आहे.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील टीका केली. महापालिका निवडणुकीत काही पक्षांनी थेट गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली आहे, असे म्हणत मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आता अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर पलटवार केला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळला परदेशात पळवून कुणी लावलं? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. मुरलीधर मोहोळ यांनीच घायवळला पळून लावल्याचे संकेत अजित पवार यांनी दिल्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

अजित पवार कुणाचेही नाव न घेता म्हणाले की, एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? त्याला पासपोर्ट कोणी दिला? तो कसा पळाला? त्यांनीसुद्धा गेल्या काही वर्षात कोणाकोणाला कशी उमेदवारी दिली, याची पण माहिती काढा. मी पुण्यात गेल्यावर भाजपची आणि माझी यादी दाखवतो. कोणाचे उमेदवार कसे आहेत हे पाहा, मग सगळं स्पष्ट होईल. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुत्रावरही गुन्हे दाखल आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावरूनही, अजित पवारांनी भूमिका मांडली. गुन्हे दाखल आहेत, पण त्यात तो दोषी ठरलाय का? आता माझ्यावर 70 हजार कोटींचे आरोप झाले, ज्यांनी आरोप केले त्यांच्या सोबत मी बसलोय ना? याचा अर्थ आरोप म्हणजे दोषी नाही.’

दरम्यान, मुरलीधर मोहोळ म्हणाले होते की, ‘पालकमंत्री म्हणतात, शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे. मात्र, त्यांची उमेदवारी यादी पाहिली तर ती कोणत्या तत्त्वात हे बसते, त्यांनीच सांगावे. गुन्हेगारांना राजकारणात स्थान नसावे. दुसऱ्या पक्षाने गुन्हेगारांना उमेदवारी दिली. परंतु आम्ही दिली नाही. पुणेकर पाहत आहेत की, नेमकी कोणाला उमेदवारी दिली गेली आहे. मतपेटीमधून त्याचे उत्तर मतदार देतील, असे म्हणत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अप्रत्यक्षरीत्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधला होता.

पुणे महानगपालिकेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पाहा संपूर्ण यादी…

चर्चांना उधाण! कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला अजित पवार गटाकडून उमेदवारी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *