राजकारणात खळबळ! पार्थ अन् जय पवार या दोन भावांमध्ये वादाची ठिणगी पडणार…

jai-pawar-parth-pawar
Share

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अजितदादांच्या दोन मुलांमध्ये खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित दादांचे पुतणे रोहित पवार यांनी केला आहे.

अजित पवार गटाचे नेते खासदार पार्थ पवार यांच्या कार्यशैलीने नाराज असलेल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशिवाय झालेल्या या अनपेक्षित भेटीने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. रोहित पवार म्हणाले, जय पवार हे मुख्यमंत्र्यांना भेटल्याची माहिती आहे ज्या पद्धतीने काका – पुतण्यामध्ये वाद लावत पवार साहेब आणि अजितदादांना भाजप आणि राष्ट्र्वादीच्या नेत्यानी दोघांना वेगळं केलं. त्याप्रमाणे येत्या काळात दोन भावांमध्ये वाद लावण्याच प्रयत्न भाजपकडून केला जाईल. पार्थ आणि जयमध्ये राजकीय दृष्टीकोनातून मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जर यामध्ये मदत कोणी करत असेल तर अजित दादांच्या पक्षातील जे नेते अमित शाहांना भेटले ते सर्व भाजपचे ऐकून या दोन नेत्यांमध्ये वाद लावल्याशिवाय राहणार नाही. फक्त मुश्रीफ आणि भुजबळ या दोन नेत्यांचा या कटात सहभाग नाही.’

राष्ट्रवादी अजित पवार गटाते सर्व वरिष्ठ नेते दिल्लीत अमित शाहांना भेटायला गेले होते. दिल्लीत अमित शाहांना भेटण्यासाठी गेलेल्या त्या सर्व नेत्यांना पवार साहेबांनी राजकारणात संधी दिली. प्रत्येक नेत्याचं काही ना काही कर्तृत्व असते त्यामुळे त्या कर्तृत्वावर नेते मोठे होतात पण ते पवार साहेबांचे देखील राहिले नाही. नंतरच्या काळात अजित दादांनी वेगळी पार्टी काढली. अजित दादा हयात असताना भुजबळ आणि मुश्रीफ हे दोन नेते सोडले तर इतर नेत्यांनी अजितदादांना त्रास दिला, असेही रोहित पवार म्हणाले.

विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी; रोहित पवारांची मागणी

मोठा गौप्यस्फोट! रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील…

रोहित पवार यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य; पक्की माहिती शिकार होणार…

रोहित पवार यांचा गौप्यस्फोट, अजित दादांच्या घराबाहेर अनेक नेत्यांची करंगळी कापली…

अजितदादा विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवार यांचा खळबळजनक दावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!