सूरत (गुजरात): भाजपच्या एका नेत्याच्या सुनेनं राहत्या घरात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून महिलेनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती आणि त्याच्या कथित प्रेयसीला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
निधी सिंह असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. त्या सूरत शहरातील स्थानिक महिला नेत्या शशी सिंह यांच्या सून होत्या. त्या पळसाणा येथील कडोदरा भागात असलेल्या श्रीनिवास सोसायटीत सासरच्या कुटुंबासोबत राहत होत्या. सुरुवातीला या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. कुटुंबीयांना या मृत्यूमागे काहीतरी मोठं कारस्थान असल्याचा संशय होता. त्यामुळे निधीच्या मृतदेहाचे ‘पॅनेल पोस्टमार्टम’ करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती.

पोस्टमार्टम प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना निधीच्या अंतर्वस्त्रात दडवलेली एक सुसाईड नोट आढळून आली. या एका सुसाईड नोटमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळाले आहे. या चिठ्ठीत निधीने तिच्या पतीने केलेल्या मानसिक छळाचा आणि अनैतिक संबंधाचा सविस्तर उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
सुसाईड नोटमधील मजकुराच्या आधारे निधीचा भाऊ याने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पतीने एका दुसऱ्या युवतीसोबत ठेवलेल्या अनैतिक संबंधांमुळे निधी प्रचंड मानसिक त्रासातून जात होती आणि याच त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीवरून कडोदरा पोलिसांनी निधीचा पती सौरभ आणि त्याची कथित प्रेयसी इशिका बॅनर्जी या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फक्त तक्रारीच्या आधारेच नव्हे, तर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि प्राथमिक तपासात हाती आलेल्या महत्त्वाच्या पुराव्यांची दखल घेत दोन्ही आरोपींना तत्काळ अटक केली आहे.
महाराष्ट्रात रॅकेट उघड! भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक
भाजप नेत्याच्या फॉर्च्युनरवर पेट्रोल टाकून लावली आग; तिघांचा जळून मृत्यू
पुणे! भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्यावर झाडल्या धडाधड नऊ गोळ्या