पुणे : पुण्याच्या देहुरोड शहरातील गांधीनगर भागात राहणारे रमेश रेड्डी यांचा काल अज्ञात हल्लेखोरांनी गोळया झाडून खून केल्याची धक्क्दायक माहिती उघडकीस आली आहे. काल रात्री ९ च्या सुमारास रेड्डी हा शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळील एका टेलरच्या दुकानात कपडे घेण्यासाठी आपल्या मित्रांसोबत गेला होता. याचवेळी त्याच्या मागावर असलेल्या हल्लेखोरांनी संधी साधत रमेश रेड्डी यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला.
हल्लेखोरांनी हात-पाठ आणि डोक्यात तब्बल ९ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात रेड्डी गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारानंतर काही स्थानिक युवकांनी आणि रेड्डीच्या मित्रांनी जखमी अवस्थेत रेड्डी याला उपचारासाठी आधार रुग्णालयात दाखल केले. परंतु अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रमेश रेड्डी यांचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आला. रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचे कारण पोलीस तपासात समोर येणार आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. देहुरोडला गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक येथे अग्निशस्त्र वापरुन एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचताच रमेश रेड्डी याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले. सवाना चौकातील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रमेश रेड्डीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकं पाठवली आहेत.