पुणे : काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डिबेट शोसाठी ते संबंधित ठिकाणी गेले असताना तुषार दामगुडे आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हनुमंत पवार म्हणाले, ‘मी एका वृत्तवाहिनीच्या डेबिट शोला गेलो होतो तिथं मी भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता त्याची आठवण करून दिली आणि याचाच राग या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना आला. बाहेर आल्यानंतर मला धमकवण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ याबद्दल बोललो तर तुला राग का येतो असे म्हणतं कमरेला बघ पिस्टल आहे, अशा पद्धतीने धमकवण्यात आले. मी अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि अशा पिस्टलला देखील घाबरत नाही असं बोलल्यानंतर थेट त्यांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्या छातीवर आणि तोंडावर मारले आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे ही कुठली पद्धत आहे.’

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
डिबेट झाल्यानंतर बाहेर आलो, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत बोलत होतो. तुषार दामगुडे यानं शिवीगाळ केली, असा आरोप देखील हनुमंत पवार यांनी केला. भाजपच्या विरोधात का बोलतो असे म्हणत कमरेच्या उजव्या बाजूला असलेले पिस्तूल त्याने दाखवले. तुषार दामगुडेच्या चार पाच सहकाऱ्यांनी मारहाण केली. पुण्यात जिवंत फिरायचं असेल तर भाजप विरोधात बोलायचं नाही, अशी धमकी देखील त्यांनी दिली, असे हनुमंत पवार यांनी म्हटले आहे.
डीसीपी मिलिंद मोहिते यांनी तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार यांच्यात बाचाबाची झाली. तिथे असलेल्या चार ते पाच जणांनी हनुमंत पवार यांना मारहाण केलेली आहे. या संदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तुषार दामगुडेचे ते सगळे मित्र आहेत.