मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने झाले आहेत. मात्र प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला? याबाबत सर्वांना प्रतिक्षा आहे. अजित पवार यांचा अपघात नेमका कसा झाला? हे जाणून घेण्यासाठी AAIB च्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचा रिपोर्ट अजून सहा महिने येणार नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास विविध यंत्रणांकडून सुरु आहे. यामध्ये Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) चा देखील समावेश आहे. या तपासात अपघाताची नेमकी कारणे काय आहेत, ते शोधण्याच्या दृष्टीकोनातून तपास केला जात आहे. तर सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, एआयबीचा जो रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तपास होणार नाही. AAIB कडून प्राथमिक चौकशी अहवाल जारी केला आहे. मात्र अद्याप अंतीम अहवाल आला नाही. हा अहवाल आल्यानंतरच सीबीआयच्या तपासाला दिशा मिळणार आहे. त्यामुळे या अहवालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवारांच्या अपघात प्रकरणात एएआयबीचा रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. या संदर्भात मी माहिती घेतली आहे. आतापर्यंत विमानाचा ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे. आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आणि केंद्र सरकारला, गृह मंत्रालयाला आणि मंत्री महोदयांना मी विचारलं की, साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे? त्यांनी मला हे सांगितलं की, साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल. अंतिम रिपोर्ट जो आहे, आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे.
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
‘रोहित पवार म्हणाले होते की एएआयबीचा रिपोर्ट येण्यासाठी साधाराण ३-४ वर्ष लागतात, हे खरं आहे. पण अजित पवारांच्या अपघाताप्रकणी केंद्र सरकारने विनंती केली आहे. तपास करण्यासाठी परदेशातले सगळे तज्ज्ञ याच्यात घेतलेले आहेत, अमेरिकेतली एजन्सी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे, त्यांना लवकरात लवकर रिपोर्ट देण्याची विनंती केली आहे. त्यांनी देखील विनंती मान्य केली आहे. दुर्दैवाने असं म्हणू नये पण दादांची जी काही पुण्यतिथी येईल त्याच्या अगोदर हा रिपोर्ट यावा, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. तो रिपोर्ट येईल आणि हा रिपोर्ट आल्यानंतर मग सीबीआय असेल किंवा सीआयडी पण असेल त्यांचा तपास होईल. त्या रिपोर्टमध्येच धागेदोरे मिळणार आहेत,’ असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चर्चांना उधाण! अजितदादा गेल्यानंतरचा पहिला वर्धपानदिन अन् रुपाली चाकणकर यांची दांडी…
अजित पवार यांच्या मृत्यूशी कनेक्शन सांगणारे अशोक खरात याचे अनेक कॉल रेकॉर्ड…
सनसनाटी गौप्यस्फोट! दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली…
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…
अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…