तुकाराम मुंढे यांची मुंबईतील ६ मोठ्या हॉटेल्सकारवाई; थेट परवाने रद्द…

tukaram-mundhe
Share

मुंबईः मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करण्यात आली. मुंबईतील आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटसह सहा रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरी आणि क्लबच्या अन्न सुरक्षा परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नरिमन पॉइंट येथे ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची 27 जून रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापनेच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर बोरीवली इथल्या एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. याशिवाय, भांडुप, सांताक्रूझ आणि वांद्र्यातही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. यासाठी टोल-फ्री क्रमांक 1800222365 उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

दरम्यान, अनेक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये ग्राहक गेल्यानंतर त्याच्या समोर बाटलीबंद पाणी आणून ठेवलं जाते. तसं न करता ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी हे मोफत उपलब्ध करून द्या, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले. तसा बोर्ड समोर लावणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. जर एखाद्या ग्राहकाला बाटलीबंद पाणी हवं असेल, त्याने मागणी केली तरच त्याला ते देण्यात यावं, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

तुकाराम मुंढे यांचा ॲमेझॉन इंडियाला मोठा दणका; थेट गोदामाचा परवाना रद्द…

हॉटेलधारकांनो ग्राहकांसमोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढे

मोठी खळबळ! तुकाराम मुंढे यांची विकेट काढण्यासाठी 250 कोटींची सुपारी…

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्याकडून महत्त्वाची जबाबदारी घेतली काढून…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *