धोक्याचा इशारा! कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांचा नवा Video व्हायरल…

Cockroach-Janta-Party
Share

मुंबईः सोशल मीडियासह देशभरात जोरदार चर्चेत असलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ जारी केला आहे. “कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने काही ठिकाणी निदर्शने केली जाणार आहेत, मात्र या आंदोलनांशी आपला कोणताही संबंध नाही,” असे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, समर्थकांनी घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत अभिजीत दिपके म्हणाले, “मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, काही जण कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने निदर्शने करत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आपण कुठल्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही आणि आपण आता आंदोलन करणार नाही. कॉकरोच जनता पार्टीच्या सर्व समर्थकांना विनंती आहे की, घाईघाईने असा कुठलाही निर्णय घेऊ नका, ज्यामुळे आपल्या चळवळीवर परिणाम होईल. सरकारला आपण एक चूक करावी, हेच हवं आहे. त्यामुळे आपण तसं करु नये. ही मोठी लढाई आहे आणि आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आज काही ठिकाणी लोक आंदोलने करणार आहेत, मात्र त्यात आपला काहीही संबंध नाही. ज्या लोकांना आपल्यापासून त्रास होत आहे, ते लोक मुद्दामून अशा कृत्यांनी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

दरम्यान, मूळचे महाराष्ट्रातील असलेले आणि सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे शिक्षण घेत असलेल्या अभिजीत दिपके यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. इन्स्टाग्रामवर या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल २ कोटींच्या पार गेली होती. मात्र, दिपके यांनी आधीच भीती व्यक्त केल्याप्रमाणे त्यांची सोशल मीडिया खाती हॅक करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अभिजीत यांचे वैयक्तिक इन्स्टाग्राम खाते हॅक झाले असून, बॅकअप म्हणून तयार केलेले कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत खाते देखील हटवण्यात आले आहे.

अभिजीत दिपके यांनी त्यांना येणाऱ्या धमक्यांचे व्हिडिओ आणि पोस्ट ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. तसेच कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत ‘एक्स’ खाते भारतात ब्लॉक करण्यात आले आहे, ज्यावर 2 लाख 1 हजार फॉलोअर्स होते. त्यानंतर दिपके यांनी ‘कॉकरोच इज बॅक’ (@CockroachIsBack) या नावाने नवीन खाते सुरू केले असून, अवघ्या काही दिवसांत या नवीन खात्याचे फॉलोअर्स 1 लाख 87 हजारांवर पोहोचले आहेत.

आपल्याला बदनाम करण्यासाठी आयटी सेल सक्रिय असल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. “कॉकरोच जनता पार्टीचे 94 टक्के फॉलोअर्स हे भारतीय नागरिक आहेत. असे असतानाही या चळवळीला पाकिस्तानी ठरवण्याची घाई काही लोक का करत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सायबर हल्ले आणि धमक्यांनंतरही ही डिजिटल लढाई शांततापूर्ण मार्गाने लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

कॉकरोच जनता पार्टी का सुरु केली; आमचे अकाउंट हॅक करायचे प्रयत्न…

महाराष्ट्रातील मुलाने सुरु केली कॉक्रोच जनता पार्टी; फॉलोअर्सच्या संख्येत भाजपलाही टाकलं मागे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *