भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सावळागोंधळ…

Atal-Bihari-Vajpayee-Medical collage pune
Share

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
पुणे : पुणे महानगरपालिका अंतर्गत चालणारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात अनेक गंभीर प्रश्न असून, सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी, प्रवेश प्रक्रियेत कथित भ्रष्टाचार, तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नोटिसांमुळे या महाविद्यालयाच्या मालकी, नियंत्रण आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच डॉक्टरांच्या वेतनाचे मुद्देही समोर आले आहेत.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत डॉक्टरांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टरांचे वेतन नियमितपणे आणि वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक डॉक्टरांना काम केल्यानंतरही पगारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. डॉक्टरांचे वेतन उशिरा का होतं? याचं प्रत्येक महिन्याला वेगळं कारण दिले जाते. फेस आयडी मशीन लावून सुद्धा पगार वेळेवर होत नाही. या सर्व प्रकरणाबाबत राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

महाविद्यालयातील काही वरिष्ठ डॉक्टर प्रत्यक्षात कमी वेळ उपस्थित राहूनही पूर्ण वेतन घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे नियमितपणे सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये यामुळे असंतोषाचे वातावरण आहे. उपस्थिती, कामाचे तास आणि रुग्णसेवेची गुणवत्ता यांची चौकशी करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

महाविद्यालय प्रशासनाकडून प्रमाणपत्रे तसेच नियुक्तीपत्रे वेळेवर दिली जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, एका आमदाराने दूरध्वनीद्वारे हस्तक्षेप केल्यानंतर तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कायमस्वरूपी डॉक्टरांच्या भरती प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोपही पुढे आला आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून काही उमेदवारांना नियमबाह्य पद्धतीने लाभ देण्यात आल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाबाबत राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित तक्रारीत वेतन विलंब, प्रशासनातील अनियमितता, वरिष्ठ डॉक्टरांची उपस्थिती आणि भरती प्रक्रियेतील कथित गोंधळ यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

महाविद्यालयातील वाढत्या तक्रारींमुळे आता राज्य सरकार, पुणे महानगर पालिका आणि संबंधित विभाग काय भूमिका घेतात, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णसेवा आणि डॉक्टरांचे कामकाज यावर या वादाचा परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय नेमके कोणाचे? खासगी की सरकारी?

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय गोंधळामुळे चर्चेत!

पुणे शहरात दोन महिन्यात साडेसहा हजार जणांना चावले श्वान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *