राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळात अडकलं, इमर्जन्सी लँडिंग…

eknath-shinde
Share

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरला खराब हवामान आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. वैमानिकाच्या प्रसंगावधामुळे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जुहू एअरपोर्टवर उतरवण्यात यश आले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून कल्याण आणि मुरबाड दौऱ्यासाठी रवाना झाले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हवामानात अनपेक्षित बदल झाला. कल्याण परिसरात अचानक वादळी वारा आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले. हेलिकॉप्टर हवेत असतानाच या वादळाच्या तडाख्यात सापडले. सोसाट्याचा वारा आणि खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. अशा गंभीर परिस्थितीत प्रसंगावधान राखून वैमानिकाने तांत्रिक कौशल्याचा वापर केला आणि हेलिकॉप्टरला वादळाच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतरावर नेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने हेलिकॉप्टर तात्काळ जुहू विमानतळाच्या दिशेने वळवले आणि तिथे यशस्वी ‘इमर्जन्सी लँडिंग’ केले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्र्यांसोबत एकूण आठ जण उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने खालील व्यक्तींचा समावेश होता एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), प्रभाकर काळे (स्विय सहाय्यक), विनायक पात्रूडकर (मुख्य जनसंपर्क अधिकारी), राजपूत (OSD), मुख्य सुरक्षा अधिकारी आणि अन्य कर्मचारी.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व अधिकारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…

पुणे जिल्ह्यात छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक…

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *