सुप्रिया सुळे म्हणाल्या; पवार यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, मागच्या वेळेस…

supriya-sule
Share

मुंबई : गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी नातवंड आहेत पवार आडनावाची आहेत यांच्या विरोधात कधीही इलेक्शन लढणार नाही. हेही इलेक्शन मी लढले नव्हते, याही इलेक्शनचा खूपसा इतिहास आहे. जो आज सांगणं गरजेचं वाटत नाही. मागच्या वेळेस देखील तयारी आणि इच्छा बिलकुल नव्हती इथून पुढेही नसणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

पवारांच्या कुटुंबातल्या बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही. दुसरा मतदार संघ बघेन, मला देशाची सेवा करायची आहे, जर दुसऱ्या कोणाची इच्छा असेल तर मी दुसऱ्या मतदारसंघात काम करेन अडचण काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. जी लढाई टीव्ही वरती चालते ते कुठल्याही सुसंस्कृत घरात होऊ नये अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. फार कष्टाने पवार कुटुंबावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकांनी जो विश्वास दाखवला आहे. संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते असतात जे आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून काम करत असतात. त्यामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी मी हे पाऊल टाकलेले आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. विधानपरिषदेच्या निमित्ताने महाविकास आघाडीत झालेल्या घडामोडी आणि त्यासंदर्भात झालेलं राजकारण बोलताना सुप्रिया सुळे यांनी मविआ संविधान वाचवण्यासाठी एकत्रित आल्याचं म्हटलं. याशिवाय बारामतीत गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची पवार आडनावाची नातवंडं आहेत त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘माझं काल रात्रीच उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं होते. उद्धव ठाकरे यांचा काल शरद पवार यांना फोन आला होता. जयंत पाटील यांच्याशी देखील बोलणं झालं होतं आणि कालच आम्हाला हे कळलं होतं. मीही काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले होते. आता एका मताने महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे विधान परिषदेवर जात आहेत. खरंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा चालली होती. हर्षवर्धन सपकाळ मगाशीच सविस्तर बोलले आहेत. आता वेगळं काय बोलायची गरज वाटत नाही. मी असं काही बघत नाही, पवार साहेबांची देखील बिनविरोध निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने बिनविरोध का दिला? शिंदेंच्या शिवसेनेने बिनविरोध का दिला? महाविकास आघाडी एका विश्वासाच्या प्रेमाच्या नात्यानं संविधान वाचवण्यासाठी एकत्रित आलेली आहे. समंजस पद्धतीने तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करत आहेत, त्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात त्यापेक्षा जास्त काही नाही.’

दिल्ली की पुन्हा पवार? राज्यसभेवर पुनरागमनासाठी मविआत खलबतं; सुप्रिया सुळेंनी थेट रणशिंग फुंकल!

अजितदादांचा घातपात? रोहित पवार यांच्या प्रश्नांनंतर सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी…

सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं ठरलं लग्न; होणारा जावई कोण पाहा…

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *